बद्धकोष्ठता, गॅस, ब्लोटिंगवरील घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
एशियन हॉस्पिटलचे संचालक आणि एचओडी-गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी डॉ. अमित मिग्लानी यांच्या मते, हिवाळ्यात आपल्या दैनंदिन सवयी आणि आहारात काही छोटे बदल केल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि बहुतेक पचन समस्या टाळता येतात. हे नक्की काय बदल आहेत याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया
गरम वा कोमट पाण्याचे सेवन करावे
थंडीत तहान कमी लागते, पण शरीराची पाण्याची गरज तशीच राहते. डॉक्टर म्हणतात की कोमट पाणी चयापचय क्रियाशील ठेवते आणि पचनास मदत करते. दिवसभरात ७-८ ग्लास पाणी आणि सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. तुम्ही रोज सकाळी उठून नियमित कोमट पाणी पित असाल तर गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही आणि पोटही साफ राहते.
30 मिनिटात साफ होईल पोट, बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय ठरले रामबाण
फायबरयुक्त पदार्थ आवश्यक
हिवाळ्यात लोक ब्रेड, भात, मैदा आणि तळलेले पदार्थ जास्त खातात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस वाढतो. डॉक्टरांच्या मते, दैनंदिन आहारात गाजर, मुळा, टोमॅटो आणि बीटसारखे सॅलड, पालक, मेथी आणि बथुआसारख्या हिरव्या भाज्या आणि ओट्स, दलिया, बाजरी आणि ज्वारीसारखे धान्य असावे. सफरचंद, नाशपाती आणि संत्री यासारखी फळे देखील फायदेशीर आहेत. यातील फायबर आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. याशिवाय हिवाळ्याच्या दिवसात मोहरीचा पाला खाणेही फायदेशीर ठरते.
जड आणि तळलेले पदार्थ खाणे कमी करा
हिवाळ्यात पराठे, कचोरी, भजी आणि मिठाई असे पदार्थ खाणे सामान्य आहे. विशेषतः उत्तर भारतात थंडी जास्त असल्याने अशा पद्धतीचे पदार्थ अधिक खाल्ले जातात, परंतु हे पदार्थ गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्येचे मूळदेखील आहेत. यामध्ये भरपूर तेल, तूप आणि मसाले असतात, ज्यामुळे आम्लता आणि गॅस वाढू शकतो. रात्री हलके जेवण खाणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या आहारात हा बदल नक्की करा.
प्रोबायोटिक पदार्थ खा
हिवाळ्यात आतड्यांमधील मायक्रोबायोटा किंवा चांगले बॅक्टेरिया कमकुवत होतात. म्हणून, दही, ताक, ढोकळा, इडली आणि कमी मीठाचे लोणचे यासारखे प्रोबायोटिक पदार्थ नियमितपणे खाणे खूप फायदेशीर आहे. डॉ. मिग्लानी स्पष्ट करतात की हे प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य मजबूत करतात आणि गॅस आणि आम्लता सारख्या समस्या कमी करतात.
जास्त वेळ उपाशी राहणे टाळा
जास्त वेळ उपाशी राहिल्याने पोटात आम्ल जमा होऊ शकते, ज्यामुळे Acid Reflex होऊ शकते. म्हणून, दर ३-४ तासांनी हलके, संतुलित जेवण घेणे महत्वाचे आहे. तसेच, जेवणानंतर लगेच झोपणे टाळा, कारण यामुळे पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाऊ शकते, ज्यामुळे छातीत जळजळ वाढू शकते.
बद्धकोष्ठतेत 4 पदार्थ रामबाण, न खाल्ल्यास मूळव्याध-फिस्टुलाची खात्री; ऑपरेशनही Fail, BDA चे उपाय
चांगली झोप घ्या
सकाळच्या सूर्यप्रकाशात राहिल्याने आणि १०-१५ मिनिटे चालल्याने व्हिटॅमिन डी वाढते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. याव्यतिरिक्त, दररोज ७-८ तासांची योग्य झोप घेतल्याने ताण कमी होतो आणि पचनक्रिया योग्यरित्या सुधारते. तुम्ही आयुर्वेदिक त्रिफळा पावडर, इसबगोल आणि कोमट लिंबू पाणीदेखील घेऊ शकता, जे नैसर्गिकरित्या बद्धकोष्ठता दूर करण्यास आणि तुमचे पोट हलके ठेवण्यास मदत करू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






