Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिफिन रेसिपी! पराठ्याला द्या टेस्टी टच, नाश्त्यासाठी झटपट बनवा चिली गार्लिक पराठा; लहान मुलेही होतील खुश

सकाळच्या नाश्त्यासाठी बहुतेक घरांमध्ये पराठ्याची निवड केली जाते. पराठे अनेक प्रकारे बनवले जातात पण तुम्ही कधी गार्लिक चिली पराठा खाल्ला आहे का? हा पराठा झटपट तयार होतो, सकाळच्या घाईगडबडीत तुम्ही याला पटकन बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2025 | 01:25 PM
टिफिन रेसिपी! पराठ्याला द्या टेस्टी टच, नाश्त्यासाठी झटपट बनवा चिली गार्लिक पराठा; लहान मुलेही होतील खुश

टिफिन रेसिपी! पराठ्याला द्या टेस्टी टच, नाश्त्यासाठी झटपट बनवा चिली गार्लिक पराठा; लहान मुलेही होतील खुश

Follow Us
Follow Us:

पराठा हा भारतीयांच्या घराघरात बनणारा एक लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीचा नाश्ता आहे. पराठा हा अनेक प्रकारे बनवला जातो. जसे की, बटाट्याचा पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा पण आज मात्र आम्ही तुमच्यासाठी एका हटके पराठ्याची रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. कोणतीही स्टफिंग न घालता तुम्ही मिरची आणि लसूण घालून एक चविष्ट असा चिली गार्लिक पराठा तयार करू शकतो. हा पराठा चवीला अप्रतिम लागतो आणि कमी वेळेत झटपट बनून तयारही होतो.

Shravan 2025:उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा खमंग मऊ उपवासाचा पराठा, उद्भवणार नाही पित्ताचा त्रास

पराठ्याला दिलेला हा हटके टच लहान मुलांना खायला खूप आवडेल. तेच तेच बोरिंग पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवी रेसिपी नक्की ट्राय करू पाहा. लसणाचा सुगंध आणि मसालेदार चव या पराठ्याला आणखीन खास बनवते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा पराठा तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • मीठ – ½ टीस्पून
  • तेल – १ टेबलस्पून
  • पाणी – गरजेप्रमाणे
  • बारीक चिरलेला लसूण – १.५ टेबलस्पून
  • ताजी हिरवी मिरची (बारीक चिरलेली) – १
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • चिल्ली फ्लेक्स – १ टीस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • जिरे पावडर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ टीस्पून
पार्टी असो वा संध्याकाळची क्रेव्हिंग; स्टफ्ड चीज गार्लिक ब्रेड तुम्हाला नाराज करणार नाही, नोट करा रेसिपी

कृती:

  • चिली गार्लिक पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल घालून त्यात थोडं थोडं पाणी घालून मऊ पीठ मळा आणि झाकून १५-२० मिनिटं बाजूला ठेवून द्या.
  • एका पॅनमध्ये १ टीस्पून तेल गरम करून त्यात लसूण परतवा
  • लसूण हलकासा ब्राऊन झाल्यावर त्यात हिरवी मिरची, लाल तिखट, चिल्ली फ्लेक्स, जिरे पावडर आणि मीठ घालून १-२ मिनिटं परता
  • नंतर गॅस बंद करून कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या.
  • पीठाचे समान गोळे करून त्याच्या छोट्या पुऱ्या लाटा
  • एका पुरीवर स्टफिंग ठेवून दुसरी पुरी त्यावर ठेवून कडा बंद करा आणि हलक्या हाताने पराठा लाटा. या ट्रिकने
  • पराठा बनवल्यास तुमचा पराठा फाटणार नाही.
  • तवा गरम करून त्यावर पराठा शेकताना वरून तेल/लोणी लावा. दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत पराठा भाजा.
  • गरमागरम चिली गार्लिक पराठा दही, लोणचं किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत सर्व्ह करा.
  • यामध्ये किसलेलं चीज घालून ‘चीज चिली गार्लिक पराठा’ देखील बनवू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

पराठ्याचे लोकप्रिय प्रकार कोणते?
आलू पराठा, पनीर पराठा आणि कोबी पराठा

पराठ्यासोबत काय खायला हवं?
पराठे दही, लोणचे, चटण्या किंवा गरमागरम चहासोबत खाल्ले जातात

Web Title: Tiffin recipe give a tasty twist to paratha make quick chili garlic paratha for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
1

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
3

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
4

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.