मेंदूमधील रक्तवाहिन्या का फुटतात?
शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्याचे काम मेंदू करतो. पण मेंदूचे आरोग्याचं बिघडलेले असेल तर शरीराची कार्यक्षमता पूर्णपणे बिघडून जाते. मेंदूचे कार्य थांबते आणि आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत एका जागेवर बसून राहिल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे मेंदूमधील रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची शक्यता असते. पण मेंदूमधील नसा ब्लॉक झाल्यानंतर तातडीने औषध उपचार केले नाहीतर मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शरीरामध्ये जाणवत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.
मेंदूसंबंधित त्रास जाणवू लागल्यानंतर सुरुवातील काही किरकोळ आणि छोटीमोठी लक्षणे जाणवू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे जाणून छोट्या आजारांचे मोठ्या आजारांमध्ये रूपांतर होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. ब्रेन हॅमरेजमध्ये मेंदूमधील रक्तस्र्ताव वेगाने होत असल्यामुळे डोक्याच्या आतमध्ये असलेले रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेंदूमधील रक्तवाहिन्या नेमक्या कशामुळे फुटतात? ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: झोपेच्या कमतरतेमुळे जाणवू शकतो अशक्तपणा! मग रोजच्या आहारात करा ‘या’ हर्बल टी चा समावेश
मेंदूमधील रक्तवाहिन्या का फुटतात?
मेंदूमधील रक्तवाहिन्या फुटण्यामागे काही कारणसुद्धा आहेत. अनेकदा कार अपघातामध्ये किंवा क्रीडा अपघात इत्यादी कारणांमुळे मेंदूमधील नसा फुटण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूमधील नसा फुटतात. मेंदूमधील नसा फुटल्यानंतर रक्तस्त्राव होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मेंदूमध्ये रक्त गोठल्यानंतर रक्तवाहिन्यामध्ये चरबीच्या गाठी तयार होण्यास सुरुवात होते. सेरेब्रल एन्युरिझम हा रक्तवाहिन्यांमधील कमकुवत भाग आहे ज्यामुळे रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. अतिप्रमाणात धूम्रपान, मद्यपान किंवा कोकेन युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे मेंदूमधील रक्तवाहिन्या फुटतात.
हे देखील वाचा: Mental Health खराब होण्याआधी दिसतात ‘हे’ 5 संकेत, वेळीच जाणून घ्या
मेंदूमधील रक्तवाहिन्या का फुटतात?
शरीराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, झोप, व्यायाम करणे गरजेचे आहे. शरीरामध्ये व्यायाम किंवा इतर गोष्टींचा अभाव निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. मेंदूमधील नाजूक रक्तवाहिन्या फुटू नये म्हणून मद्यपान आणि अंमली पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करु नये. तसेच आहारात ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण कडधान्य इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. तसेच रोजच्या रोज व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा तयार करणारे पदार्थ खाऊ नये, असे पदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडते. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी नियमित औषध खावीत.