हर्बल टी पिण्याचे फायदे
बदलत्या जीवनशैलीसोबतच आहारात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा येणे, सतत चक्कर येणे, रात्रीच्या वेळी झोप न येणे, कामात लक्ष न लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता जाणवू लागल्यानंतर रात्रीच्या झोपेवर सुद्धा परिणाम लगेच दिसून येतो. शरीराला संतुलित आहारासोबतच झोपेची सुद्धा आवश्यकता असते. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांती देण्यासाठी रात्रीच्या वेळी झोप घेणे गरजेचे आहे. पण अनेकदा शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर रात्री लवकर किंवा जास्त वेळ झोप लागत नाही.या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात कोणत्या हर्बल टी चा समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हर्बल टी पिण्याचे फायदे
सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी कॅमोमाइल चहा प्यायल्यामुळे रात्री व्यवस्थित झोप लागते. कॅमोमाइल फुलांपासून हा चहा बनवला जातो. या चहामध्ये चहामध्ये ऍपिजेनिन नावाचे अँटी-ऑक्सिडेंट आढळून येते, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच अपुऱ्या झोपेमुळे शरीरात निर्माण झालेले ताण तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित कॅमोमाइल चहाचे सेवन करावे.
हे देखील वाचा: तुम्हाला दूध किंवा चीज पचण्यात अडचण येते? कॅल्शियमचे ‘हे’ 6 पर्याय तुमच्यासाठी वरदान ठरेल
हर्बल टी पिण्याचे फायदे
पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि दालचिनी मदत करते. सकाळी उठल्यानंतर दालचिनीचा चहा प्यायल्यामुळे झोपेची समस्या कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेमुळे पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात दालचिनीच्या चहाचे सेवन करावे.
हर्बल टी पिण्याचे फायदे
आरोग्यासाठी पेपरमिंट चहा फायदेशीर आहे. यामध्ये असलेले गुणधर्म निद्रानाशच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतात. पेपरमिंट चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.तसेच पेपरमिंट चहाचा प्यायल्यामुळे शरीराला शांतता मिळते.
हे देखील वाचा: Mental Health खराब होण्याआधी दिसतात ‘हे’ 5 संकेत, वेळीच जाणून घ्या
हर्बल टी पिण्याचे फायदे
मानसिक तणाव कमी करण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी रोजच्या आहारात लैव्हेंडर चहाचा समावेश करावा. हा चहा बाजारात सहज उपलब्ध होतो. लैव्हेंडर चहा प्यायल्यामुळे रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप लागते. तसेच झोपेची गुणवत्ता सुधारून आरोग्य सुधारण्यास मदत होते.