रोज ब्रश केल्यानंतरही तोंडातून वास येतोय
बाहेरील सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्याचीही वेळोवेळी काळजी घेणे फार गरजेचे असते. अनेकदा ब्रश केल्यानांतरही आपल्या तोंडातून घाण वास येत असतो. या वासाचा इतरांनाच नाही तर स्वतःलाही त्रास होतो. यामुळे बऱ्याचदा इतरांशी बोलायला किंवा त्यांच्यासमोर तोंड खोलायला आपल्याला लाज वाटू लागते, कोणाला आपल्या तोंडाचा दुर्गंध वास आला आणि आपल्यावर कोणी हसले तर … अशी भीती अनेकांच्या मनात येऊ लागते. तोंडाच्या वासामुळे अनेक लोक आपल्यापासून दुरावली जाऊ शकतात. तसेच्या यामळे आपले आरोग्य खराब होऊ शकते.
श्वासाची दुर्गंधी हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जसे की हिरड्यांचे आजार, प्लेक आणि टार्टर, जिभेवर दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू, विशिष्ट पदार्थांचे सेवन, अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखू इ. तोंडाची दुर्गंधी ही सल्फर आणि केटोन्स सारख्या रेणूंमुळे, खाल्लेल्या अन्नामुळे आणि काही औषधांमुळे येऊ शकते. रात्रभर तोंडात राहणारे अन्नाचे कण जीवाणूंमध्ये बदलतात आणि मग हे श्वासाला दुर्गंधी निर्माण करतात. अभ्यासातून समोर आले आहे की, अनेकदा दात घासले, माउथवॉश वापरले तरीही तोंडातून दुर्गंध वास बाहेर येत असतो. तुमच्यासोबतही असेच काहीसे होत असेल तर चिंता सोडा आणि खाली दिलेले घरगुती उपाय नक्की ट्राय करा. हे उपाय निश्चितच तुमच्या तोंडातील दुर्गंधी घालवण्यास मदत करतील.
दही
तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दही खाल्ल्याने तोंडातील हायड्रोजन सल्फाइडची पातळी कमी होते. दही हे व्हिटॅमिन डी समृद्ध नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे. त्यामुळे आता तोंडातून दुर्गंध वास येत असेल तर दही खायला विसरू नका.
फळे आणि भाज्यांचे सेवन करा
तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी फळे आणि भाज्या तुमची मदत करू शकतात. यासाठी तुम्ही ब्लॅकबेरी आणि लिंबू सारख्या लिंबूवर्गीय फळांचे सेवन करू शकता. तोंडातील वासाची समस्या दूर करण्यासाठी अधिक फायबरयुक्त गोष्टी खायला सुरुवात करा.
ओवा चघळा
अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त ओवा एक मसाल्याचा पदार्थ असून प्रत्येक स्वयंपाक घरात आढळला जातो. ओव्यातील पोषक घटक दुर्गंधीशी लढण्यास मदत करतात. तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी ओवा चघळायला चालू करा.
या पदार्थांचे सेवन करा
तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचे सेवन करू शकता. यात काकडी, गाजर, केळी, हिरवा चहा, आले, हळद, नाशपाती, सफरचंद आणि सेलेरी यांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ लाळ निर्माण करण्यास मदत करतात. या पदार्थांचे सेवन करा आणि श्वासाची दुर्गंधी दूर होईल.