
नवी दिल्ली : तज्ज्ञांच्या मते, किडनी स्टोन (Kidney Stone) ही महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळणारी सामान्य समस्या आहे. दहापैकी एकाला कधीतरी किडनी स्टोन होऊ शकतो. अशा वेळी काही घरगुती उपाय (Homemade Remedies) करून आराम मिळू शकतो. याविषयी जाणून घेऊया
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नारळाचे पाणी आपल्याला ताजे आणि उत्साही वाटण्यास मदत करते, त्यात औषधी गुणधर्म देखील आहेत. नारळाचे पाणी (Coconut Water) प्यायल्याने लघवीचे (Urine) प्रमाण वाढू शकते यामुळे किडनी स्टोन बाहेर काढण्यास मदत होते. नारळाच्या फुलांपासून बनवलेली पेस्ट दह्यासोबत घेतल्याने किडनी स्टोनवर ही मात्रा लागू पडते.
तमालपत्रातही (Bay Leaf) अनेक औषधी गुणधर्म असतात. किडनी स्टोनसाठी तुम्ही तमालपत्राचा चहा बनवू शकता. चहा करण्यासाठी वेलचीसोबत तमालपत्राची काही पाने पाण्यात एक तृतीयांश होईपर्यंत उकळवा. नंतर गाळून घ्या.
जाणकारांच्या मते ओव्याचे रोप सहज उपलब्ध होते. त्याचे एक पान घ्या आणि त्यात थोडी खडी साखर बारीक करून एकत्र करा. दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्याने स्टोन काही वेळात बाहेर पडतात.
[read_also content=”प्रासंगिक : पूर्वजांचे स्मरण : कृतज्ञता https://www.navarashtra.com/blogs/expressing-gratitude-towards-the-ancestors-nrvb-329381.html”]
किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी ग्रीन टी (Green Tea) चाही वापर केला जाऊ शकतो. हे मूत्रपिंडात कॅल्शियमचे संचय कमी करण्यास मदत करू शकते. हे लघवीतील ऑक्सलेटचे उत्सर्जन देखील कमी करू शकते. जास्त द्रव मूत्र तयार करण्यास मदत करू शकते.
स्टोनच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी डाळिंब हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि किडनी स्टोनमध्ये नैसर्गिक पद्धतीने आराम मिळतो.