ना पावडर, ना स्प्रे! फक्त ही पाने घरात ठेवा आणि ओलावा-बुरशीपासून सुटका मिळवा; वेळीच जाणून घ्या ही घरगुती ट्रिक
सध्या पावसाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत जिथे तिथे ओलावा आणि दमात वातावरण जाणवत राहतं ज्यामुळे अनेक आजार या ऋतूतच जन्माला येत असतात. हा ओलसरपणा फक्त बाहेरच नाही तर घराच्या आतही दिसतो ज्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या घरात बुरशी साठू लागते. बाथरूममध्ये बुरशी सर्वात जास्त वाढते, यासोबतच कधी कधी कपाटात ठेवलेल्या कपड्यांनाही बुरशी लागते ज्यामुळे आपले कपडे खराब होतात. बुरशी फक्त घरचेच नुकसान करत नाही तर याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. बाजारात ही बुरशी घालवण्यासाठी अनेक स्प्रे, पावडर उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी बुरशीला कसं घालवायचं आणि यापासून आपली आणि आपल्या कुटुंबाची कशी सुटका करायची याची एक सोपी घरगुती ट्रिक सांगणार आहोत. ओलसरपणा आणि बुरशी कमी करण्यासाठी तुम्ही घरी तुळशीच्या पानांचा वापर करू शकतात. तुळशीची पाने ओलावा शोषून घेण्यास प्रभावी ठरतात.
बुरशी काढून टाकण्याचे मार्ग
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार महत्त्व आहे. आपल्याकडे याची पूजा केली जाते मात्र तुळस फक्त धार्मिक महत्त्वामुळेच लोकप्रिय नसून याच्या पानांच्या वापर करून अनेक समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते. वास्तविक, तुळशीच्या पानांत औषधी गुणधर्म असतात जे पावसात तुमचे आणि तुमचे घर निरोगी ठेवतात. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. तुळशीच्या पानांचा तीव्र सुगंध माश्या, डास आणि कीटकांना दूर नेतो. तुळशीची पाने हवेत असलेल्या बुरशीला वाढण्यापासून रोखतात. ज्या पर्वतांमध्ये भरपूर पाऊस पडतो, तिथे लोक तुळशीची पाने त्यांच्या स्वयंपाकघरात किंवा ओलसर ठिकाणी ठेवतात. असे केल्याने बुरशी आपोआपचा नाहीशी होते.
बुरशी घालवण्यासाठी कसा करणार तुळशीच्या पानांचा वापर?
बुरशी दूर करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुळशीची पाने घेऊन ही पाने वाळवून घ्यावी लागतील. यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांना काही तास उन्हात सुकवत ठेवू शकता. तुळशीची पाने एकदा का सुकली मग त्यांना तुमच्या स्वयंपाकघरात आणा आणि जिथे ओलसरपणा किंवा ओलावा असेल तिथे त्यांना ठेवून द्या. तुम्ही सिंकभोवती, लाकडी कपाटात किंवा ज्या ठिकाणी ओलावा बुरशी आहे त्याठिकाणी त्यांना ठेवून देऊ शकता. डबे ठेवण्याच्या शेल्फमध्येही यांना ठेवू शकता. तुळशीच्या पानांचा सुगंध हवा शुद्ध करेल आणि बुरशी वाढणे थांबेल.
बुरशी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
तुळशीची पाने नैसर्गिक असल्याने याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. हे पूर्णपणे रसायनमुक्त आणि सुरक्षित असल्याचे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तुळशीची पाने ठेवल्याने श्वास घेण्यास त्रास होणार नाही किंवा त्वचेवर कोणतीही ऍलर्जी होणार नाही. प्रत्येकाच्या घरी तुळशीचं झाड असतंच अशात कोणताही खर्च न करता तुळशीच्या पानांच्या या उपायाने तुम्ही घरीच ओलसरपणा आणि बुरशीच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
आहारात तुळस कशी समाविष्ट करावी?
सॅलड, सॉस आणि पेस्टोमध्ये ताजी तुळशीची पाने घाला, तुळशीची पाने चावून खा, मांसाच्या पदार्थांमध्ये तुळशीचा वापर करा.
तुळशीचे फायदे काय?
तुळस कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यात योगदान देऊ शकते, तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तुळस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते, जे मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.