पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! रोजच्या आहारात करा फायबर असलेल्या 'या' पदार्थांचा समावेश
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
फळे खाण्याचे फायदे?
फायबर शरीरासाठी का महत्वाचे आहे?
जगभरात वाढलेल्या वजनाने आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे वजन झपाट्याने वाढते. पोट, मांड्या, हात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर चरबीचा थर वाढल्यानंतर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. आपल्यातील अनेकांना कायमच भूक लागत असते. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच अर्धा तासाने पुन्हा एकदा काहींना काही खावे वाटते. ही केवळ पोटाची समस्या नसून शरीरातील संप्रेरके, रक्तातील वाढलेल्या साखरेचे प्रमाण आहेत. वजन वाढल्यानंतर कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा महागडे डाएट, तासनतास व्यायाम करून वजन कमी करतात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांमध्ये असेलेले नैसर्गिक घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतील.(फोटो सौजन्य – istock)
नाशपाती किंवा पेरमध्ये सहज विरघळून जाणारे फायबर युक्त घटक आढळून येतात. यामुळे पोट रिकामी राहते. फायबर असलेल्या पदार्थांचे आहारात नियमित सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. पेर खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते. यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा पूर्णपणे कमी होऊन जाते. पेरमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. नाशपातीमधील फायबर, फिनॉलिक्स घटक आतड्यांसाठी चांगले असतात.
वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन किंवा तीन केळी खावीत. केळी खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. केळीमध्ये विरघळणारे फायबर असतात, यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय केळीमध्ये असलेले इतर घटक भूक नियंत्रणात ठेवतात आणि रक्तातील साखरेची पातळी कायमच संतुलित ठेवतात. पिकलेली केळी खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक गोडवा पोट जास्त वेळ भरलेले ठेवते.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप जास्त आवडते. आंबटगोड चवीची स्ट्रॉबेरी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात इतर पदार्थांसोबतच वाटीभर स्ट्रॉबेरी खावी. स्ट्रॉबेरीमधील फायबर आणि फायटोकेमिकल्स जेवणानंतर ग्लुकोजची पातळी वाढू देत नाही. त्यामुळे कधीही स्ट्रॉबेरीचा ज्यूस पिण्याऐवजी स्ट्रॉबेरी कच्ची खावी.
नाश्त्यात नियमित एक अख्खे सफरचंद खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते.केवळ सफरचंदच नाहीतर साल सुद्धा खावी. सफरचंदमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. दुपारच्या वेळी कामात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा झाल्यास तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सफरचंद किंवा इतर कोणत्याही फळाचे सेवन करावे.
Ans: दररोजच्या आहारात फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण वाढवा, प्रक्रिया केलेले अन्न टाळा आणि दररोज व्यायाम करा.
Ans: होय, दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि पोट फुगणे कमी करण्यास मदत करतात.
Ans: साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करा, आणि पोटाचे व्यायाम






