पावसाळ्यात ‘ही’ ठिकाण आहेत ट्रेकिंग[blurb content=””][blurb content=””]साठी बेस्ट
पावसाळा आला की सगळ्याची पावले हि फिरण्यासाठी बाहेर निघतात. निसर्गरम्य वातावरण हे जणू खूणावत आहे असे वाटते, हिरवीगार झाडी, ओल्या मातीच सुंगध यासगळ्या गोष्टी मनाला खूप भावून जातात. डोंगररांगामधुन डोकावणारे धबधबे हे अधिक आकर्षित करतात. पावसाळ्यात ट्रेकरची पावले हि गड किल्ल्याकडे सहज वळतात. उन्हाचा, पावसाचा किंवा थंडीचा फरक पडत नाही. पावसाळ्यात मात्र डोंगररांगाची ओळख करण्यात वेगळी मज्जा आहे. शनिवार रविवार या डोंगररांगामधुन फिरणारे अनुभवी ट्रेकर्स आणि गावकरी यांचे एक नाते जुळलेले असते. सह्याद्रीच्या डोंगररांगा ट्रेकर्सना कायम खुणावत असतात.
ट्रेकिंगसोबत नवीन पाऊल वाटा शोधण्यात एक वेगळीच अनभुव असतो. पायथ्याशी असलेली गावे ट्रेकर्संना एक मदतीचा हात असतो. ट्रेकर्स सोबत वाटाड्या म्हणुन जाणे, त्यांना हवी ती साधनसामग्री पुरवणे, जेवणाची सोय करणे अशा अनेक गोष्टींमध्ये स्थानिकांची मदत मिळते.
तिथे जेवण करुन पुन्हा एकदा त्यांच्या निघण्याचा प्रवास सुरु होतो. स्थानिकांची मदत ही नवख्या ग्रुपने घ्यायलाच हवी. केवळ कुणीतरी सांगितलेल्या माहितीच्या आधाराने ट्रेकची सुरुवात करण्यापेक्षा बरोबर अनुभवी व्यक्ती असणे हे केव्हाही योग्य . जवळ प्रथमोपचाराचे साहित्य असणे गरजेचे आहे. कधी कोणती गोष्ट होईल हे सांगता येत नाही. पावसाळ्यात गवतातुन चालताना पायांची योग्यती काळजी घेईला हवी. तुम्ही गडकिल्ल्या सोबत अन्य ठिकाणी ट्रेकिंगला जायचं विचार करत आहात तर हि आहेत ती ठिकाणे सिंहगड, रायरेश्वर, कळसुबाई, रायगड,हरीश्चंद्र गड, माहुली, कर्नाळा, पेब, अलंग मदन कुलंग,पुरंदरगड, सुधागड, कोरीगड, विसापुर तुम्ही ट्रेकिंग सोबत निसर्गसौंदर्यचा एक वेगळाच अनुभव घेता येईल.






