गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे उपाय
शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात झालेले बदल, अपुरी झोप, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडण्यास सुरुवात होते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पचनसंस्थेवर ताण येण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटात दुखणे, पोट फुगणे, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पचनसंस्था खराब झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी फॉलो न करता आरोग्याची काळजी घेत आहारात बदल करणे आवश्यक आहे. बद्धकोष्ठतेचा समस्या उद्भवल्यानंतर सकाळी उठल्यावर पोट फुगल्यासारखे वाटू लागते. या समस्येमुळे संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
दैनंदिन आयुष्य जगताना निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी नियमित योगासने किंवा प्राणायाम करावे. ज्यामुळे शरीर सक्रिय होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी योगासने आणि प्राणायाम नियमित करावीत. ज्यामुळे मन शांत आणि राहते आणि बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नियमित योगासने केल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याच्या चहाचे सेवन करावे. आल्याच्या चहामध्ये असलेले गुणधर्म पोट स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यासाठी आलं किसून चहा बनवून घ्या. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आल्याच्या चहाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ होईल आणि पोट दुखीची समस्या उद्भवणार नाही. पोटातील गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी आलं अतिशय फायदेशीर आहे. कारण आल्यात दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात.
जेवल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया योग्य प्रकारे होते. कोमट पाण्याच्या सेवनामुळे पचनासंबंधित सर्व समस्या दूर होतात. तसेच थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे अन्न लवकर पचन होते पण पोटातील अन्नपदार्थ सडून जातात. त्यामुळे जेवल्यानंतर कोमट पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी प्यावे.
पचनासंबंधित समस्या कायमच्या दूर करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यात असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पोटात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.