Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभरात कमी होईल पोट मांड्यावर वाढलेले वजन! सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करा ‘हा’ चिमूटभर पदार्थ

पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी उपाशी पोटी जिऱ्याचे सेवन करावे. जिऱ्याच्या सेवनामुळे पोटावर वाढलेली चरबी जाळून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 01:26 PM
महिनाभरात कमी होईल पोट मांड्यावर वाढलेले वजन! सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करा 'हा' चिमूटभर पदार्थ

महिनाभरात कमी होईल पोट मांड्यावर वाढलेले वजन! सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करा 'हा' चिमूटभर पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे?
चरबीचा घेर कशामुळे वाढतो?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी गोष्टीच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाण्याची शक्यता असते. जगभरात वाढलेल्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. लठ्ठपणा आणि पोट मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारातील महागडे डाएट तर कधी वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या सप्लिमेंट्स आणि गोळ्या औषधांमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेली अनावश्यक चरबी तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे वाढते. यामुळे मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब यांसारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणतेही फॅन्सी उपाय करण्याऐवजी दैनंदिन आहारात बदल आणि घरगुती उपाय करावेत. यामुळे पोट आणि मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – istock)

Parenting Tips: वाढत्या स्क्रीन टाइमचा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम; तज्ज्ञांनी दिला पालकांना सतर्कतेचा इशारा

पोट मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी जिऱ्याचे सेवन करावे. जेवणाला फोडणी देताना त्यात जिरं टाकलं जाते. यामुळे खाल्लेला पदार्थ सहज पचन होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये असलेले आयुर्वेदिक औषधी गुणधर्म शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. कमीत कमी वेळात वजन कमी करायचे असल्यास जिऱ्याचे सेवन करावे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले जिरं संपूर्ण शरीरासाठी प्रभावी ठरते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खास तुम्ही जिऱ्याचे पाणी बनवून पिऊ शकता.

जिऱ्याचे पाणी बनवण्याची सोपी कृती:

जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी, एक ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा जिरं भिजत ठेवावे. रात्रभर जिरं पाण्यात भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाणी टोपात ओतून जिरं व्यवस्थित उकळवून अर्धा पाणी करावे. जिऱ्याच्या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून जिऱ्याचे पाणी गाळून कोमट करण्यासाठी ठेवा. कोमट पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. याशिवाय जिऱ्याच्या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबाचा रस किंवा मध सुद्धा मिक्स करू शकता.

जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही केमिकल युक्त पेयांचे सेवन करण्याऐवजी जिऱ्याचे पाणी प्यावे. जिऱ्याच्या पाण्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते आणि आतडे स्वच्छ होतात. पोटाची चरबी कमी करण्यापासून ते ऍसिडिटीच्या समस्येवर जिऱ्याचे पाणी प्यायल्यास लगेच आराम मिळेल. जिऱ्याचे पाणी शक्यतो रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे लवकर फरक दिसून येईल.

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे:

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्यायले जाते. जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे वजन नियंत्रणात राहते, खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. पण जिऱ्याचे पाणी मर्यादित प्रमाणात प्यावे. अतिप्रमाणात जिऱ्याचे पाणी प्यायल्यास आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. तसेच वजन कमी करताना नियमित व्यायाम आणि योगासने सुद्धा करावीत. व्यायाम केल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जलद वजन कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: गोड पेये, साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ (processed food) आणि फॅटी पदार्थ टाळा.

  • Que: वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा?

    Ans: जेवणात मसूर, अंडी, मासे किंवा दही यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा, ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.

  • Que: व्यायाम किती महत्त्वाचा आहे?

    Ans: निरोगी राहण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. .

Web Title: The increased weight on the stomach and thighs will decrease within a month after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • home remedies
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य
1

अभिनेत्री प्रियांका चोप्राने लावलेल्या ब्लॅक डायमंड मास्कची मोठी चर्चा, जाणून घेऊया ग्लोईंग चेहऱ्याचे रहस्य

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल
2

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!
3

पायांमध्ये सतत जळजळ होतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो गंभीर आजाराचा इशारा!

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज
4

Skin Care Tips: तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या होतील गायब! रात्री झोपण्याआधी त्वचेवर करा ‘या’ तेलाने मसाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.