Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात प्रवाशांचा कंफर्ट वाढवण्यासाठी United Airlines ‘Relax Row’ नावाच्या नवीन इकॉनॉमी सीट्स आणत आहे, ज्यामुळे सीट्सचे सोफ्यासारख्या आरामदायी बेडमध्ये रुपांतर होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 08:37 AM
फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Relax Row’ सीट्समध्ये पाय ठेवण्यासाठी एडजस्टेबल लेगरेस्ट असून अधिक जागा मिळते.
  • तीन सीट्स एकत्र करून गादीसारखा आरामदायी सपाट पृष्ठभाग तयार करता येतो.
  • 2027 पासून ही सुविधा सुरू होणार असून 2030 पर्यंत अनेक विमानांमध्ये उपलब्ध होईल.
प्रवासाचा आनंद तेव्हा वाढतो जेव्हा त्यात कंफर्ट ॲड होतो. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमान प्रवास सर्वात वेगवान पर्याय मानला जातो. पण यात सीट्सवर अधिक काळ बसून आपला कंफर्ट कुठेतरी हरवतो. विमानाच्या सीट्सवर फार काळ बसल्याने आपल्या हाता-पायांंमध्ये वेदना होऊ लागतात तसाच आपला प्रवास अनुभव अधिक थकवणारा बनतो. यामुळे मळमळ, चक्कर येणे, थकवा अशा बऱ्याच समस्या जाणवू लागतात. पण आता या सर्व समस्याांना दूर करता येणार आहे कारण युनायटेड एअरलाइन्स अलिकडे एक नवा उपक्रम घेऊन आली आहे ज्यानुसार लांब पल्ल्याच्या विमानांमधील इकॉनॉमी सीट्सचे आता सोफ्यांमध्ये रुपांतर केले जाईल. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

‘युनायटेड रिलॅक्स रो’ म्हणजे काय?

शिकागोमध्ये वसलेल्या ‘युनायटेड रिलॅक्स रो’ या नवीन इकाॅनाॅमी सीट्सची घोषणा केली आहे. या नवीन इकाॅनाॅमी सीट्समध्ये पायांना रेस्ट करण्यासाठी एडजस्टमंट फिचर बसवण्यात येणार आहे. हे रेस्ट्स ९०-अंशाच्या कोनात वरच्या दिशेने दुमडले जातात, ज्यामुळे आडवे होण्यासाठी किंवा अंग ताणण्यासाठी अधिक जागा मिळू शकेल. एअरलाइनने म्हटले आहे की, उत्तर अमेरिकेतील ही एक अशी पहिली कंपनी आहे जी पायांच्या आरामासाठी सीट्समध्ये हे फिचर देत आहे. असेही म्हटले जात आहे की, या महाद्वीपावर अशा प्रकरच्या डिजाईनच्या सीट्स बनवण्याचा अधिकार फक्त याच कंपनीकडे आहे.

‘युनायटेड रिलॅक्स रो’ का आवश्यक आहे?

“युनायटेडच्या लांब पल्ल्याच्या विमानप्रवासात इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक जागा आणि अधिक आराम मिळायला हवा, आणि हे आम्ही त्यांना देऊ शकण्याचा हा एक मार्ग आहे,” असे युनायटेडचे ​​कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी अँड्र्यू नोसेला यांनी म्हटले.

‘रिलॅक्स रो’ सीट्स कशा काम करतात?

इकॉनॉमी क्लासच्या ‘रिलॅक्स रो’ मध्ये तीन सीट्सची पूर्ण रांग असणार आहे. जेव्हा तीन लेगरेस्ट वर उचलले जातात तेव्हा तीन स्वतंत्र उभ्या सीट्सऐवजी ते एक गादीसारखा पृष्ठभाग तयार करतात, म्हणजेच सीटचे रुपांतर एक गादीत होते ज्यानर तुम्ही आरामदायी अनुभव घेऊ शकता. मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना, अधिक जागेच्या शोधात असलेल्या जोडप्यांना आणि जास्त खर्च करण्यास तयार असलेल्या एकल प्रवाशांना याचा नक्कीच फायदा होईल. प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार बनवलेली गादी, ब्लँकेट, अतिरिक्त उशा आणि मुलांसाठी एक मऊ खेळणे देखील पुरवले जाईल. या सर्वच गोष्टींमुळे आता प्रवाशांच्या विमान अनुभवामध्ये मोठा बदल घडून येणार असल्याचे समजत आहे.

The entire row is alllllll yours. Welcome to United Relax Row, three adjacent United Economy seats with adjustable leg rests that can each be raised or lowered to create a cozy lie-flat space for stretching out… You’ll also get a mattress pad, blanket and two pillows. If… pic.twitter.com/Q6gcOuXbXo — United Airlines (@united) March 24, 2026

सोन्याची नक्काशी आणि जमिनीवर ४०० शूरवीरांच्या कबरी; माल्टाच्या सेंट जॉन्स को-कॅथेड्रलची कथा जाणून घ्या

‘रिलॅक्स रो’च्या जागा केव्हा उपलब्ध होतील?

युनायटेडने सांगितले आहे की, २०२७ मध्ये प्रथमच ‘रिलॅक्स रो’ सीट्स सादर करण्याची त्यांची योजना आहे. २०३० पर्यंत २०० हून अधिक बोईंग ७८७ आणि ७७७ वाइडबॉडी विमानांमध्ये या सीट्स वेगाने तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विमानात १२ पर्यंत ‘रिलॅक्स रो’ विभाग बसवून, युनायटेड या सुविधेला लांब पल्ल्याच्या विमानांच्या ताफ्याचा एक सामान्य भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ काही मार्गांवरच नाही तर पुढे जाऊन सर्वच मार्गांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा विचार आहे.

Web Title: United airlines unveils relax row seats converts seat into sofa travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • Airlines
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 
1

India NDC Paris Agreement: भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी 

सोन्याची नक्काशी आणि जमिनीवर ४०० शूरवीरांच्या कबरी; माल्टाच्या सेंट जॉन्स को-कॅथेड्रलची कथा जाणून घ्या
2

सोन्याची नक्काशी आणि जमिनीवर ४०० शूरवीरांच्या कबरी; माल्टाच्या सेंट जॉन्स को-कॅथेड्रलची कथा जाणून घ्या

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास
3

देशातील या ठिकाणाला म्हटलं जात हजारो मंदिराचं शहर, अनोखा आहे इथला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.