Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Acharya Balkrishna यांनी सांगितला Uric Acid चा उत्तम उपाय, ‘चमत्कारी औषधा’ने होईल विषाचा खात्मा

शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास आचार्य बाळकृष्ण एक खास पावडर खाण्याची शिफारस करतात. ही पावडर कशी बनवायची आणि ती तुमच्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकते तेदेखील जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 12, 2025 | 01:55 PM
आचार्य बाळकृष्ण यांचे घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

आचार्य बाळकृष्ण यांचे घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात युरिक अ‍ॅसिडची समस्या खूप सामान्य झाली आहे. शरीरात वाढत्या युरिक अ‍ॅसिडमुळे केवळ सांधेदुखी, पेटके आणि सूज येत नाही, तर वेळीच काळजी घेतली नाही तर ते संधिवात आणि मूत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजारांचे मूळ कारण देखील बनू शकते. 

युरिक अ‍ॅसिड हे एक विष आहे. काही अन्नपदार्थांमुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि नंतर मूत्रपिंड ते रक्तातून गाळून मूत्रासोबत शरीराबाहेर टाकतात. तथापि, जर युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असेल तर मूत्रपिंडांवर दबाव वाढतो. या स्थितीत, मूत्रपिंड ते फिल्टर करू शकत नाहीत आणि शरीरातील वाढलेले युरिक अ‍ॅसिड सांध्यामध्ये जमा होऊ लागते. यामुळे, व्यक्तीला सांधे तीव्र वेदना, सूज, लालसरपणा किंवा कडकपणाचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी पतंजलिचे आचार्य बाळकृष्ण यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत आपण ते या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

वाढलेले युरिक अ‍ॅसिड कसे कमी करावे?

युरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणे

यासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, काही नैसर्गिक पद्धतींच्या मदतीने, तुम्ही युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करू शकता किंवा शरीरातून हे विष पूर्णपणे काढून टाकू शकता. बाबा रामदेव यांचे सहकारी आणि आयुर्वेद केंद्र पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांनी अशीच एक खास पद्धत सांगितली आहे.

त्यांच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्ट केले की, ‘युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यासाठी तुम्ही एक खास पावडर बनवून त्याचे सेवन करू शकता. हे पावडर केवळ युरिक अ‍ॅसिड मुळापासून काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरणार नाही तर सांधे मजबूत आणि निरोगी ठेवण्यास देखील मदत करेल.’

युरिक अ‍ॅसिड त्वरीत काढेल शरीराबाहेर, 5 आयुर्वेदिक उपाय कराच

कशी बनवाल औषधी पावडर

  • पावडर बनवण्यासाठी तुम्हाला गोखरू, सुके आले, मेथीचे दाणे आणि अश्वगंधा हे साहित्य लागेल. या चारही गोष्टी समान प्रमाणात घ्या आणि त्या एकत्र बारीक करा. असे केल्याने तुमची पावडर तयार होईल
  • दररोज सकाळी आणि संध्याकाळी पावडर घ्या. आचार्य बालकृष्ण म्हणतात की, ही पावडर नैसर्गिक पद्धतीने शरीरात जमा झालेले युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास प्रभावी ठरू शकते. याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून घेऊ शकता 

गोखरूचा फायदा 

NCBI च्या अहवालानुसार, गोखरू ऑक्सलेट, कॅल्शियम आणि फॉस्फेटचे उत्सर्जन कमी करते. यामुळे रक्तातील युरिया नायट्रोजन (BUN), युरिक अ‍ॅसिड आणि क्रिएटिनिनची पातळी कमी होण्यास मदत होते. याशिवाय, गोखारूमध्ये मूत्रवर्धक गुणधर्म आहेत. हे गुणधर्म मूत्रपिंडांचे कार्य सुधारतात, ज्यामुळे शरीरातून युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यासदेखील मदत होते.

सुके आले

सुके आले ठरेल फायदेशीर

काही अहवालांच्या निष्कर्षांवरून असे दिसून येते की सुक्या आल्यामध्ये इथाइल एसीटेट नावाचा घटक आढळतो, जो हायपरयुरिसेमिक (उच्च युरिक अ‍ॅसिड) पातळी कमी करण्यास प्रभावी ठरू शकतो. याशिवाय, सुक्या आल्यामध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जनदेखील सुधारते.

युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी चहा प्यावा की कॉफी? काय ठरते फायदेशीर कशाचा होतो तोटा

मेथीचा करा वापर 

मेथी दाणे वापरा

मेथीचे दाणे चयापचय वाढविण्यासाठी आणि युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. याशिवाय, मेथीच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जास्त युरिक अ‍ॅसिडमुळे सांधेदुखी आणि सूज यापासून आराम देतात. मेथीचा तुम्ही यासाठी नियमित वापर करून घेऊ शकता. मात्र पित्ताचा त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

अश्वगंधा

अश्वगंधाचा करा वापर

या सर्वांव्यतिरिक्त, अश्वगंधामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मदेखील आढळतात. युरिक अ‍ॅसिडमुळे होणारे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी हे प्रभावी आहेत. तुम्ही अश्वगंधाच्या पावडरचा नियमित उपयोग केल्यास युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Uric acid home remedies by acharya balkrishna miracle powder of methi sonth health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • gut health
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट
1

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट

नियमित एक कप मोरिंगा चहाचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील बदल, आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे
2

नियमित एक कप मोरिंगा चहाचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील बदल, आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे

छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
3

छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल साफ
4

बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल साफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.