युरिक अॅसिड रूग्णांसाठी काय योग्य चहा की कॉफी?
प्रत्येकाच्या शरीरात युरिक अॅसिड असते. पण खाण्याच्या विकारांमुळे काही लोकांमध्ये युरिक अॅसिड वाढते आणि ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात शरीरात जमा होऊ लागते. याला गाउट म्हणतात. गाउट हा सांध्यातील गुठळ्यांचा आजार असून त्यामुळे असह्य वेदना होतात. त्यामुळे उठताना, बसताना आणि चालतानाही त्रास होतो. बोटांना आणि सांध्यांना सूज येते.
युरिक ॲसिड वाढविण्यात अन्नाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे गाउट किंवा युरिक ॲसिड वाढलेल्या प्रत्येक व्यक्तीने काळजीपूर्वक विचार करूनच आपला आहार ठरवला पाहिजे. कारण काही खाद्यपदार्थांमुळे युरिक ॲसिड वाढू शकते, यामध्ये सी फूड, कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल, जास्त साखरेचे पदार्थ, लाल मांस इत्यादीचा समावेश आहे. अशा लोकांना वाढत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर युरिक अॅसिड रूग्ण चहा किंवा कॉफी पिऊ शकतात की नाही असाही प्रश्न निर्माण होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने केलेल्या अभ्यासानुसार जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
कॉफी पिण्याचा परिणाम
कॉफी पिण्याने काय होते
बऱ्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही दररोज कॉफी प्यायली तर तुम्ही दीर्घकाळापर्यंत गाउटचा धोका कमी करू शकता. हे डिकॅफ आणि कॅफिनेटेड कॉफी दोन्हीसाठी योग्य ठरते. मात्र, कॅफिनमुळे यामध्ये अधिक सुधारणा झाल्याचे दिसते. दुसरीकडे, काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की ज्या महिला कॉफी पितात त्यांच्या रक्तात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते, जे गाउटचे कारण मानले जाते. कॉफीचा महिलांच्या संधिरोगाच्या जोखमीवर परिणाम होतो की नाही हे पाहण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
हेदेखील वाचा – शरीरात झपाट्याने वाढलेले युरीक अॅसिड 5 पद्धतीने झर्रकन करा कमी
चहामुळे युरिक ॲसिड वाढते का?
चहाचा परिणाम
युरिक ॲसिडच्या बाबतीत, ज्या पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते अशा गोष्टी खाण्यास मनाई आहे. कारण प्युरीनमुळे युरिक ॲसिडची पातळी वाढते आणि नंतर गाउटची समस्या उद्भवू लागते. अशा परिस्थितीत दुधासोबत चहा प्यायल्यास त्रास होऊ शकतो. कारण दुधात फॅट असते, ज्यामुळे युरिक ॲसिड वाढू शकते. चहा प्यायचा असेल तर दुधाशिवाय आणि साखरेशिवाय चहा प्यावा असे अभ्यासतही सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – ‘ही’ तीन पानं रक्तात जमलेलं युरीक ॲसिड काढतात बाहेर, रोज चावून करा सेवन
काय सांगतो अभ्यास?
अभ्यासानुसार काय आहे सत्य
2014 च्या पद्धतशीर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कॉफीचा वापरयुरिक ॲसिडच्या कमी पातळीशी आणि हायपरयुरिसेमियाचा धोका कमी करण्याशी संबंधित आहे, तर चहाचा वापर करणे चुकीचे ठरू शकते. अभ्यासामध्ये असेही सुचविण्यात आले आहे की, कॉफीमधील कॅफीन व्यतिरिक्त इतर संयुगे यासाठी जबाबदार असू शकतात आणि कॉफीच्या वापराशी संबंधित इंसुलिनची पातळी कमी होणे देखील भूमिका बजावू शकते.
2016 च्या मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की स्त्रियांना त्यांच्या युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक कॉफी पिणे आवश्यक आहे आणि दररोज किमान एक कप प्यायल्याने पुरूष आणि महिला दोघांमध्येही संधिरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.