अनेकदा शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढते जेव्हा मूत्रपिंड अर्थात योग्यरित्या स्वच्छ होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतो. युरिक ॲसिडचा सर्वाधिक परिणाम हा किडनीवर होत असतो. आजकाल उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार सामान्य झाले आहेत. आपल्या आजूबाजूला अनेकजण या समस्यांना बळी पडतात.
हे असे आजार आहेत ज्यावर कोणताही इलाज नाही, ते फक्त औषधे आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने नियंत्रित केले जाऊ शकतात. युरिक ॲसिड (High Uric Acid) वाढण्याची समस्यादेखील यापैकी एक आहे. यावर अनेक औषधे घेतली जातात. मात्र, औषधांव्यतिरिक्त, जीवनशैलीत काही किरकोळ बदल करूनदेखील युरिक ॲसिडची पातळी कमी केली जाऊ शकते. चला जाणून घेऊया असे काही सोपे उपाय (फोटो सौजन्य – iStock)
कसे वाढते युरीक ॲसिड?
शरीर स्वतः युरिक ॲसिड तयार करत असते. जेव्हा किडनी पूर्ण स्वच्छ होत नाही, तेव्हा त्याची पातळी शरीरात वाढू लागते आणि ते सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते, ज्यामुळे त्रास होऊ लागतो.
[read_also content=”रक्तातील युरिक ॲसिड बाहेर काढतील 3 पानं https://www.navarashtra.com/lifestyle/these-three-leaves-are-very-effective-on-uric-acid-in-blood-nrak-286386.html”]
काय आहे प्रमुख कारण
दरम्यान मूत्रपिंड अनेक कारणांमुळे युरीक ॲसिड साफ करू शकत नाही, ज्यापैकी अव्यवस्थित आणि खराब जीवनशैली हे एक प्रमुख कारण आहे. आपण बेफिकीर राहिल्यास या वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे गाउट आणि किडनी स्टोनही होऊ शकतात. युरीक ॲसिड कमी करण्यासाठी तुम्ही 5 प्रभावी आणि सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता. तुम्ही हे उपाय वापरल्यास पुढील रक्त तपासणीमध्ये तुम्हाला तुमच्या युरिक ॲसिडची पातळी कमी झाल्याचे नक्कीच दिसून येईल.
[read_also content=”सकाळी करा या ड्रिंक्सचे सेवन युरीक ॲसिड येईल नियंत्रणात https://www.navarashtra.com/lifestyle/consume-this-drink-in-the-morning-help-to-control-uric-acid-nrrd-319227.html”]
कोणते आहेत 5 सोपे उपाय
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
संदर्भ
https://www.medicalnewstoday.com/articles/325317
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10291132/
https://www.medicalnewstoday.com/articles/324972