केसांना होणारे लवंग तेलाचे फायदे
हिवाळ्यात आरोग्यासह त्वचा आणि केसांसंबधित अनेक समस्या उद्भवतात. त्वचा कोरडी पडणे, हातापायांना भेगा पडणे, सतत सर्दी खोकला इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. केसांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे शॅम्पू, हेअरमास्क, हेअर केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टी वापरतात. मात्र त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. अशावेळी घरगुती उपाय करण्यास जास्त प्राधान्य द्यावे. घरगुती उपाय केल्यामुळे केसांसंबधित समस्या कमी होऊन आराम मिळतो. केस गळती थांबते, केसांमधील कोंडा कमी होऊन टाळू स्वच्छ होते. केस गळती कायमची थांबवण्यासाठी लवंग तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे केसांच्या अनेक समस्या सुटतात. आज आम्ही तुम्हाला केसांना लवंग तेल लावण्याची योग्य पद्धत आणि लवंग तेल केसांना लावल्यामुळे काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हेअर केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
केसांना लवंग तेल लावल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस गळणे थांबते. शिवाय या तेलात असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. लवंग तेलात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळून येतात. यामुळे केसांची निरोगी वाढ होते आणि केस मजबूत राहतात. केसांना लवंग तेल लावल्यामुळे टाळूवरील अतिरिक्त तेलजमा होत नाही. शिवाय टाळू स्वच्छ आणि निरोगी राहते. केसांच्या वाढीस चालना देणारे घटक लवंग तेलात आढळून येतात.
लवंग तेल केसांना लावल्यामुळे टाळूवरील कोंडा कमी होण्यास मदत होते. शिवाय केस स्वच्छ होतात. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना लवंग तेल लावावे. तसेच यामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म कोंडा वाढू देत नाही. लवंग तेल केसांना लावताना खोबरेल तेलात मिक्स करून लावावे. ज्यामुळे टाळूवर जळजळ किंवा कोंडा होणार नाही. लवंग तेल टाळूवर लावल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांची वाढ निरोगी होते.
हेअर केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
लवंग तेलात आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराची सुटका होते. लवंग तेलाचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. शिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यासाठी मदत करतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लवंग तेल केसांना लावावे.