
तंबाखू- गुटखा खाऊन सडलेले दात पांढरेशुभ्र करण्यासाठी 'या' आयुर्वेदिक पदार्थांचा करा वापर
कुजलेले दात स्वच्छ करण्यासाठी उपाय?
दात स्वच्छ करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत?
हिरड्यांमधून रक्त येण्याची कारणे?
प्रत्येकालाच आपले दात खूप स्वच्छ आणि पांढरेशुभ्र हवे असतात. दातांची काळजी घेण्यासाठी दिवसभरातून दोन वेळा दात घासणे, गुळण्या करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीचा आहार आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे दातांवर पिवळा किंवा पांढरा थर साचून राहण्यास सुरुवात होते. दातांवर साचून राहिलेल्या पिवळेपणामुळे दातांचे सौंदर्य कमी होऊन जाते. याशिवाय चारचौघांमध्ये गेल्यानंतर हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. दातांवर पिवळा थर साचणे, दात अस्वच्छ, हिरड्यांमध्ये वाढलेला वेदना, अचानक दातांमधून रक्त येणे इत्यादी समस्या उद्भवल्यानंतर दात पूर्णपणे खराब होऊन जातात. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कॉफी-चहा, तेलकट पदार्थ, चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्यामुळे दातांमधून रक्त येते आणि दातांमधील नैसर्गिक चमक पूर्णपणे नष्ट होऊन जाते. (फोटो सौजन्य – istock)
दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला दुर्लक्ष करतात. पण वारंवार दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. दातांवर जमा झालेला पिवळा थर कमी करण्यासाठी बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. तसेच वारंवार तंबाखू आणि गुटख्याचे सेवन केल्यामुळे दात अतिशय लाल आणि सुजल्यासारखे वाटतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांवर वाढलेला घाणेरडा थर कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर नियमित केल्यास दात अतिशय स्वच्छ होतील.
जांभळाच्या बियांची पावडर
जांभळाची पाने
त्रिफळा
लवंग
सैंधव मीठ
दंतमंजन तयार करण्यासाठी सर्वप्रथम सुकलेल्या जांभळ्यांच्या बियांची पावडर तयार करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये जांभळाच्या बियांची पावडर, त्रिफळा पावडर, सैंधव मीठ, लवंग पावडर आणि जांभळ्यांच्या पानांची पावडर एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण काचेच्या हवा बंद बाटलीमध्ये भरून ठेवा. तयार केलेली दंतमंजन नियमित वापरल्यास दात स्वच्छ होतील. दातांच्या समस्या कमी करण्यासाठी नियमित दंतमंजनाचा वापर करून दात घासावे. त्यानंतर गुळण्या करून जीभ स्वच्छ करून घ्यावी.
जांभळाच्या बियांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तोंडातील बॅक्टरीया आणि इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करते. तोंडात वाढलेली कॅव्हिटी कमी करण्यासाठी जांभळ्याच्या बिया अतिशय प्रभावी ठरतील. जांभळाच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक अॅस्ट्रिंजंट गुणधर्म हिरड्यांना मजबूत करून हिरड्यांमध्ये वाढलेला रक्तस्त्राव कमी करण्यास मदत करते. दातांमध्ये वाढलेली संवेदनशीलता कमी करण्यासाठी लवंग प्रभावी आहे. याशिवाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा दात स्वच्छ करण्यासाठी दंतमंजन आणि मिठाचा वापर करावा.
Ans: दिवसातून दोनदा, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे महत्त्वाचे आहे.
Ans: तोंडातील बॅक्टेरिया साखरेचे रूपांतर ॲसिडमध्ये करतात, ज्यामुळे दातांचे इनॅमल खराब होते; यामुळे दात किडतात.
Ans: चहा, कॉफी, रेड वाईन, आणि काही गडद रंगाचे सॉस (जसे सोया सॉस) यांसारखे पदार्थ आणि पेये.