हिवाळ्यात सतत सर्दी, खोकला होतो? सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' ड्रिंकचे सेवन
थंडीत वारंवार सर्दी खोकला का होतो?
लिंबू मधाचे सेवन करण्याचे फायदे?
हिवाळ्यात आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. थंडीत सतत सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. थंड पदार्थांचे सेवन, वातावरणात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे सर्दी खोकला होतो. सर्दी झाल्यानंतर कायमच डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण यामुळे छातीत जमा झालेला कफ सुकून जातो. छातीमध्ये कफ सुकल्यानंतर वारंवार खोकला येणे, घशात कफ चिटकून राहणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. अशावेळी कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजीस्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास सर्दी खोकल्यापासून तात्काळ सुटका मिळते. आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या ड्रिंकचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक घरात मध, लिंबू उपलब्ध असतो. जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मध आणि लिंबाचा वापर केला जातो. लिंबामध्ये असलेले विटामिन सी शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. याशिवाय वाढत्या थंडीत आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा रस आणि मधाचे सेवन करावे. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी मध खावे. विटामिन सी युक्त पदार्थांच्या सेवनामुळे पांढऱ्या रक्तपेशी वाढण्यास मदत होते. मधामध्ये असलेले नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म घशात वाढलेली खवखव आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात. घशात वाढलेली तीव्रता कमी करण्यासाठी मधाचे सेवन करावे.
हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लास कोमट पाण्यात हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून घ्या. तयार केलेल्या पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्यात मध सहज मिक्स होते. कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास घशात वाढलेली खवखव कमी होऊन कफ पातळ होण्यास मदत होते. सर्दी खोकल्यामुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा आणि थकवा कमी करण्यासाठी लिंबू मधाच्या पेयांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्यास वाढलेला वजन नियंत्रणात राहील.
पिवळीधम्मक दिसतेय लघवीची धार? बाइल डक्टमध्ये अडकलेला असू शकतो Pancreatic Cancer, 6 धक्कादायक लक्षणं
सर्दी खोकला झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येणारे लक्षणे ओळखणे फार आवश्यक आहे. त्यानंतर योग्य ते उपचार करावे. चुकीच्या गोळ्या औषधांचे आणि पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. बिघडलेली पचनक्रिया, बद्धकोष्ठता आणि आरोग्यासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी मध आणि लिंबाच्या पाण्याचे सेवन करावे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लिंबू आणि मध फायदेशीर आहे.
Ans: सर्दी हा एक संसर्गजन्य रोग आहे जो अनेक विषाणूंमुळे होतो, ज्यात राइनोव्हायरस (Rhinovirus) सर्वात सामान्य आहे.
Ans: शरीराला विषाणूंशी लढण्यासाठी पुरेशी विश्रांती द्या.
Ans: वारंवार हात धुवा. आजारी लोकांपासून दूर राहा. नाक आणि डोळे यांना स्पर्श करणे टाळा.






