चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' जादुई मसाल्याचा करा वापर
वय वाढल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येणे, बारीक रेषा दिसणे, वांग इत्यादी त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम किंवा ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा काहीकाळ सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थ त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. नैसर्गिकरित्या त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ परिणाम
त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील जायफळ या मसाल्याचा वापर करावा. गोड किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवताना जायफळाचा वापर केला. जायफळमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासह त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहेत. जायफळाचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचेला अनेक फायदे होतील. यामध्ये आढळून येणारे अँटी ऑक्सिडेंट त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतील. यामुळे त्वचा आतून टाईट होईल आणि सुंदर दिसेल. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी जायफळाचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
जायफळ त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्यासाठी जायफळ पावडरचा वापर करावा. जायफळाचा वापर केल्यामुळे स्किन सेल्समध्ये वाढ होते. याशिवाय फाइन लाइन्स आणि सॅगी स्कीन इत्यादी अनेक समस्या दूर होतात. जेवण केल्यानंतर एक ग्लास पाण्यात चिमूटभर जायफळ पावडर घालून मिक्स करून घ्या. ही पावडर त्वचेवर योग्यरित्या काम करते.
जायफळ तुम्ही दुधात मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. यासाठी जायफळ घेऊन जायफळाची बारीक पावडर करून घ्या. त्यानंतर कोमट दुधात किंवा कोमट पाण्यात चिमूटभर जायफळ पावडर टाकून मिक्स करा. तयार केलेले पाण्याचे नियमित सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे झोपही गुणवत्ता सुधारण्यासोबतच रात्रीच्या वेळी चांगली झोप लागेल.
चेहरा कोरडा आणि निस्तेज झाला आहे? मग घरगुती पदार्थांचा वापर करून बनवा होममेड फेसपॅक, त्वचा होईल तरुण
जायफळ फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये जायफळ घेऊन त्यात गुलाबपाणी, कोरफड, दही आणि मध इत्यादी पदार्थ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्य. त्यानंतर १५ ते २० मिनिटं ठेवून त्वचेवर हलकासा मसाज करून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उप्याज आठवड्यातून एकदा केल्यास त्वचेवरील डाग कायमचे निघून जाते. जायफळाच्या पावडरमध्ये मध मिक्स केल्यास त्वचा उजळदार होईल.