कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसपॅक
त्वचेमधील सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर अनेक बदल दिसून येतात. प्रदूषण, ऊन, पिंपल्स, सुरकुत्या, कोरडी त्वचा इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्वचा खराब झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम, फेसमास्क, फेसपॅक आणून लावतात. मात्र यामुळे त्वचेवर काहीसा परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकल उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरडी त्वचा सुधारण्यासाठी घरगुती फेसपॅक तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे उपाय नियमित केल्यास कोरड्या त्वचेपासून सुटका होईल.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर चंदन फेसपॅक तयार करून त्वचेवर लावावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. यासाठी वाटीमध्ये चंदन पावडर घेऊन त्यात कडुलिंबाच्या पानांची पावडर घालून मिक्स करा. नंतर त्यात कोरडफचा रस टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून नंतर काहीवेळाने त्वचेवर लावून घ्या. चेहऱ्यावर लावले मिश्रण सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होतील.
फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात हळद टाकून मिक्स करा. नंतर त्यात कोरफडचा गर घालून मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण त्वचेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर फेसपॅक पूर्ण सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही. याशिवाय त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील.
चेहऱ्यासह ‘या’ अवयवांना स्क्रबिंग करणे आवश्यक! अन्यथा तारुण्यात येईल म्हातारपण, त्वचा होईल निस्तेज
कॉफी फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात ओट्सची तयार केलेली पावडर टाकून मिक्स करा. नंतर त्यात थोडेसे दही घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर फ्रिजमध्ये ५ मिनिटं ठेवून नंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. त्वचा अधिक सुंदर आणि टवटवीत दिसेल. हा स्क्रब त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होईल.