
उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बीटचा करा 'या' पद्धतीने वापर, चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचेसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळी होते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढते आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने त्वचा खूप जास्त काळी पडते आणि चेहऱ्यावरील ग्लो नष्ट होऊन जातो. त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात तर कधी फेशिअल, क्लीनअप करून चेहऱ्यावर ग्लो आणला जातो. पण केमिकल युक्त प्रॉडक्टचा वारंवार वापर केल्यामुळे त्वचा काहीकाळाचं अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचेच्या समस्या वाढतात आणि त्वचा होती तशीच होऊन जाते. सनबर्न, टॅनिंग आणि चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी कायमच स्किन केअर रुटीन फॉलो केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
नियमित करा ‘या’ लाल फळाच्या रसाचे सेवन! केसांच्या वाढीसाठी ठरेल वरदान, कायमच दिसतील सुंदर केस
बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टमध्ये वेगवेगळे रसायन वापरली जातात. यामुळे त्वचेवर ग्लो पण काही दिवसानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या वाढणे, बारीक रेषा वाढून त्वचेच्या असंख्य समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळे डाग घालवण्यासाठी बीटचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट आणि महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत, यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहील. बीटचा लहानसा तुकडा त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.
फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बीटचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मानेवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवून द्या. २० मिनिट झाल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल आणि त्वचा उजळदार सुंदर दिसेल. बीटच्या रसात अँटीऑक्सि़डंट्स चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात आणि त्वचा उजळदार करतात.
वाटीमध्ये बीटचा रस घेऊन एक चमचाभर लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि नंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहरा आणि मानेवर वाढलेला टॅन कमी होईल आणि त्वचा उजळदार होईल. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बीट आणि लिंबाचा फेसपॅक खूप जास्त प्रभावी ठरेल.
त्वचेसाठी बीट वरदान मानले जाते. कारण चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीटचा वापर करावा. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, विटामिन सी आणि लोह इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. चेहऱ्यावर जमा झालेली मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीटचा वापर करावा.