Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणात हातावर काढलेल्या मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा वापर

श्रावण महिन्यात केलेला उपवास आरोग्यासाठी चांगला असतो. या महिन्यात सर्वच स्त्रिया छान नटून थटून पूजा करण्यासाठी जातात. सणसमारंभ जवळ आल्यानंतर सगळ्यात आधी महिला पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये जाऊन नख, केस, चेहरा इत्यादी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. तसेच सणसमारंभ आणि लग्न सोहळ्यांमध्ये सर्वच महिला हातावर मेहंदी काढतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हातावर काढलेली मेहंदी आणखीन गडद करण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ वापरावे, जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 14, 2024 | 10:37 AM
मेहंदीचा रंग आणखीन गडद करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा

मेहंदीचा रंग आणखीन गडद करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा

Follow Us
Follow Us:

सणांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची सगळीकडे ओळख आहे. श्रावणातील सणांची चाहूल लागल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. श्रावणात महिला उपवास करून मनोभावे शंकराची पूजा करतात. श्रावण महिन्यात केलेला उपवास आरोग्यासाठी चांगला असतो. या महिन्यात सर्वच स्त्रिया छान नटून थटून पूजा करण्यासाठी जातात. सणसमारंभ जवळ आल्यानंतर सगळ्यात आधी महिला पार्लरमध्ये जातात. पार्लरमध्ये जाऊन नख, केस, चेहरा इत्यादी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. तसेच सणसमारंभ आणि लग्न सोहळ्यांमध्ये सर्वच महिला हातावर मेहंदी काढतात. मेहंदी काढल्यामुळे हात अगदी खुलून दिसतात.

नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव इत्यादी श्रावणातील सणांमध्ये सर्वच महिला हातावर मेहंदी काढतात. हातावर काढलेली मेहंदी छान रंगल्यानंतर हात उठावदार आणि आकर्षक दिसतात. मेहंदी काढल्यामुळे हातांचे सौंदर्य वाढते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हातावर काढलेली मेहंदी अधिक जास्त वेळ टिकून राहण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

मेहंदीचा रंग आणखीन गडद करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा:

मेहंदीचा रंग आणखीन गडद करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा

लवंग:

हातावर काढलेली मेहंदी आणखीन जास्त गडद होण्यासाठी लवंग किंवा लवंग तेलाचा वापर करा. लवंगमध्ये असलेले गुणधर्म मेहंदीचा रंग वाढवण्यासाठी मदत करतात. यासाठी तवा गरम करून त्यावर ७ ते ८ लवंगा टाकून गॅस बारीक करून घ्या. मेहंदी काढलेले हातांवर लवंगाची वाफ घेऊन मेहंदी अधिक काळ ठेवून घ्या. यामुळे तुमच्या मेहंदीला आणखीन गडद रंग येईल.

हे देखील वाचा: चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेसपॅक! अनेक समस्यांवर रामबाण उपाय

विक्स किंवा बाम:

मेहंदीचा रंग आणखीन गडद होण्यासाठी मेहंदी काढून झाल्यानंतर हाताला विक्स किंवा बाम लावा. यामध्ये असलेल्या मेन्थॉलमुळे मेहंदीचा रंग गडद होऊन मेहंदी जास्त काळ हातावर टिकून राहील. सणासुदीला मेंदी काढणं हे प्रत्येक महिलेला आवडतं. त्यामुळे मेहंदी काढल्यानंतर ती अधिक गडद कशी दिसेल याकडे तिचा कल असतो आणि त्यासाठी हा अत्यंत सोपा उपाय आहे.

कॉर्न सिरप:

कॉर्न सिरपचा वापर केल्याने हातावर काढलेली मेहंदी जास्त वेळ टिकून राहते. यासाठी कॉर्न सिरप पाण्यात मिक्स करून मेहंदी काढून झाल्यानंतर कापसाच्या साहाय्याने संपूर्ण हातांवर लावून घ्या. मेहंदी कोरडी झाल्यानंतर हळूहळू मेहंदी निघून जाईल.

हे देखील वाचा: फेस पॅक लावताना या 5 गोष्टी ध्यानात ठेवा

मोहरीचे तेल:

मोहरीच्या तेलाचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये असलेले गुणधर्म मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी मदत करतात. मेहंदी सुकल्यानंतर हातावरून काढून घ्या. त्यानंतर हातांना मोहरीचे तेल लावा. यामुळे मेहंदीचा रंग गडद होईल कारण मोहरीच्या तेलात जास्त उष्णता असते.

Web Title: Useful products which will make your mehndi darker applied on the hand during shravan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 10:26 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
1

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
2

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
3

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.