10 दिवसांच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल टिप्स
प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो. जेव्हा जेव्हा प्रवासाची संधी मिळते तेव्हा सगळेच लगेच तयार होतात, परंतु खरी समस्या तर तेव्हा येते जेव्हा प्रवासात जड सामान देखील सोबत घेऊन जाव लागतं. आणि ते उचलणे कठीण तितकच होतं. आणि जर ट्रिप 10 दिवसांसाठी असेल तर सामानाचे वजन बॅकब्रेकिंग होते. स्टेशनवर कुली सापडेल पण तरीही अक्खा प्रवास आपलं सामान आपल्यालाच घेऊन जावं लागत. त्याला स्टेशनवर घेऊन जाणे आणि हॉटेलमध्ये जाऊनदेखील त्याची काळजी घेण्याचाही कंटाळा येतो. पण प्रवासात सामान घेऊन जाण्यासाठी अशा काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील ज्यामुळे 10 दिवसांच्या प्रवासातही तुमची बॅग उत्तम स्थितीत राहील.
कपडे कसे पॅक कराल ?
10 दिवसांच्या सहलीला जात असाल तर कपडे पॅक करण्याची अजिबात काळजी करू नका. पॅकिंग करताना कपडे मिक्स आणि मॅच करावेत. कधीही परफेक्ट मॅचिंगनुसार कपडे ठेवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमच्या सामानाचे वजन वाढतच जाईल. जर तुम्ही मिक्स अँड मॅच पद्धतीने कपडे पॅक केले तर असे कपडे निवडावे लागतील जे एका पेक्षा जास्त कपड्यांवर घातला येतील. यामुळे तुमची ट्रिप कमी कपड्यातही पूर्ण होईल आणि तुम्हाला कपड्यांची कमतरता भासणार नाही. हलका स्कार्फ घेतला तर सहलीत टोपीऐवजी घालता येऊ शकतो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावर गुंडाळू शकता आणि डोक्यावरही बांधू शकता.
बॅग कोणत्या प्रकारची निवडाल
तसेच सामानासाठी तुम्ही जी बॅग निवडत आहात ती कॉम्प्रेशन प्रकारची असावी. यामुळे तुम्हाला कपडे आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी जास्त जागा मिळते. तुम्हाला वेगळी बॅग किंवा ब्रीफकेस ठेवण्याची गरज नाही. आणि प्रवासादरम्यान तुम्ही आरामात राहाल. तसेच सोबत फक्त प्रवासी आकाराचे कंटेनर ठेवावे आणि फक्त आवश्यक वस्तू ठेवाव्यात. बहुतेक हॉटेल्समध्ये मूलभूत गरज भागातील अशा गोष्टी उपलब्ध होतात जसे की टूथब्रश, टॉवेल, साबण इत्यादी त्यामुळे ते आपल्यासोबत घेऊन जाण्यात काही अर्थ नाही.