
बर्फाच्छादित पर्वत आणि गरम नदी: भारतातील अनोखे ठिकाण जिथे पाणी गरम करावे लागत नाही, त्वचेचे रोगही होतात दूर
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
चुमाथांग गाव लेहपासून सुमारे 138 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, येथील जिओथर्मल स्प्रिंग्स जमिनीखाली सुरू असलेल्या ज्वालामुखीय हालचालींमुळे तयार होतात. पृथ्वीच्या आतल्या उष्णतेमुळे पाणी तापते आणि तेच पाणी झऱ्यांच्या आणि नदीच्या स्वरूपात बाहेर येते. विशेष म्हणजे आजूबाजूचा परिसर गोठवणाऱ्या थंडीने वेढलेला असतो, तापमान शून्याच्या खाली जाते, पर्वत बर्फाने झाकलेले असतात, तरीही या नदीतून सतत वाफ उठताना दिसते.
या गावाचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथील दैनंदिन जीवन. स्थानिक लोक सांगतात की हिवाळ्यातही या गरम पाण्यात आंघोळ करता येते. त्यामुळे घरगुती वापरासाठी वेगळे पाणी गरम करण्याची आवश्यकता राहत नाही. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नदीत अंडे काही मिनिटांत उकडताना पाहणे एखाद्या चमत्कारासारखे वाटते, मात्र गावकऱ्यांसाठी ही अगदी साधी गोष्ट आहे.
भारतातील 1000 वर्षे जुने प्राचीन मंदिर जे आजही आहेत भक्कम; नवीन वर्षी यांना भेट द्यायला विसरू नका
चुमाथांगचे गरम पाणी केवळ तापमानामुळेच नव्हे तर त्याच्या औषधी गुणधर्मांमुळेही प्रसिद्ध आहे. स्थानिकांचा विश्वास आहे की या सल्फरयुक्त पाण्यात असलेले खनिज घटक त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर उपयोगी ठरतात. त्वचेची अॅलर्जी, खाज, पुरळ, तसेच सांधेदुखीच्या त्रासात या झऱ्यांमध्ये स्नान केल्याने आराम मिळतो, असे मानले जाते. याच कारणामुळे दूर-दूरहून लोक येथे खास आंघोळीसाठी येतात. पर्यटकांसाठी चुमाथांगचा अनुभव अतिशय वेगळा असतो. एका बाजूला बर्फाच्छादित उंच पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला गरम पाण्याच्या प्रवाहातून उठणारी वाफ हे दृश्य मन मोहून टाकणारा असतो. त्यामुळे लडाखची सहल आखताना चुमाथांग गावाला भेट देणे नक्कीच आवर्जून सुचवले जाते.