शाकाहारी पदार्थ जे ठरतील प्रोटीनचा स्रोत
शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी इतर पोषक तत्वांसोबत प्रथिनांचीही गरज असते. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा, केस गळणे, कमकुवत प्रतिकारशक्ती, जास्त भूक, कोरडी त्वचा इत्यादी लक्षणे शरीरात सतत दिसू लागतात. शाकाहारी लोकांना प्रथिनांच्या कमतरतेचा त्रास होण्याची शक्यता असते. कारण मांसाहार हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. अशा परिस्थितीत शाकाहारी लोकांना त्यांच्या आहारात चीज आणि टोफूचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
टोफू सोया दुधापासून बनवला जातो. अनेक आरोग्य फायद्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय आहे. शतायु आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र, हरदोईचे डॉ. अमित कुमार यांनीही टोफूच्या रोजच्या सेवनाच्या फायद्यांविषयी आयएनएसशी माहिती शेअर केली (फोटो सौजन्य – iStock)
टोफूमधील पोषक तत्व
प्रोटीनचा चांगला स्रोत
डॉ. अमित कुमार सांगतात की 100 ग्रॅम टोफूमध्ये सुमारे आठ ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय 100 ग्रॅम टोफूमध्ये फक्त 65 कॅलरीज असतात. टोफूमध्ये असलेल्या मायक्रोन्युट्रिएंट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 100 ग्रॅम टोफूमध्ये सुमारे 7 मिलीग्राम सोडियम, 121 मिलीग्राम पोटॅशियम आणि 0.3 ग्रॅम फायबर आढळते. यासोबतच यामध्ये जवळपास 35 टक्के कॅल्शियम, 30 टक्के लोह आणि 7 टक्के मॅग्नेशियम असते.
टोफू म्हणजे काय
सोयाबीनपासून टोफू बनवले जाते. याला बीन दही अथवा सोयाबीन दही असे म्हटलं जातं. टोफू एक उच्च प्रोटीन असून यामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असते. टोफूची भाजी खूपच चांगली लागते, याशिवाय सलाड आणि अन्य पदार्थांमध्ये टोफू वापरले जाते. टोफू अधिक प्रमाणात प्रोटीनचा स्रोत आहे
हेदेखील वाचा – वाढलेले वजन कमी करण्यासह इतर गुणांनी समृद्ध असलेल्या टोफूचा आहारात करा समावेश
टोफूचे फायदे
टोफू आहे प्रोटीनचा चांगला स्रोत
हेदेखील वाचा – ‘या’ 5 फूड्समध्ये आहेत कॅल्शियमचा खजिना, रोज खाल्ल्याने होतील हाडं दणकट
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.