टोफू खाल्ल्याने आरोग्याला होणारे गुणकारी फायदे
जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात जंक फूडचा समावेश न करता आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. असे पदार्थ जे खाल्ल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतील. त्यातील एक सुपरफूड म्हणजे टोफू. वाढलेले वजन कमी करण्यासाठी टोफू पदार्थ खाल्ला जातो. सोया दुधापासून टोफू तयार केले जाते. पनीर सारखा दिसणारा हा पदार्थ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
टोफूमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी टोफू खाल्ले जाते. पण ज्यांना जेवणामध्ये मसालेदार पदार्थ खायला आवडतात, अशांना हा पदार्थ आवडणार नाही. पण योग्य मसाले, सॉस वापरून तुम्ही टोफू बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला टोफू खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया टोफू खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
टोफू खाल्ल्याने आरोग्याला होणारे गुणकारी फायदे
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण आहारात टोफू खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. टोफूमध्ये फ्लेव्होनॉइड्स असल्याने हृदयाशी संबंधित आजार आणि इतर आजारांपासून शरीराचा बचाव होतो. टोफू खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात टोफूचे सेवन करावे.
हे देखील वाचा: फूड पॉयझनिंग का होते? यामागे काय आहेत लक्षणे? जाणून घ्या सविस्तर
जगभरातील कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी आहारात टोफूचे सेवन करावे. टोफूमुळे फुफ्फुसाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 10% कमी होतो.
टोफू खाल्ल्याने आरोग्याला होणारे गुणकारी फायदे
रोजच्या आहारात टोफूचे सेवन केल्याने स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. टोफूमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते.अमीनो ॲसिड्सने समृद्ध असलेल्या टोफूचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंच्या निर्मिती आणि विकासासाठी टोफू फायदेशीर आहेत.
टोफूमध्ये मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत असतो. मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यास चालना देण्याचे काम करतात. टोफूमध्ये चिकन मटण पेक्षा जास्त मँग्नेशियम असते.