
कमी पगारात फिरण्याची हौस पूर्ण करता येत नाही? 5000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला काही दिवस शांततेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवायची इच्छा असते. पण प्रवास म्हटला की अनेकांना खर्चाचा विचार डोक्यात येतो. मात्र भारतात अशा अनेक सुंदर ठिकाणी आहेत जिथे तुम्ही कमी बजेटमध्येही अप्रतिम सुट्टीचा आनंद घेऊ शकता. या लो बजेट ठिकाणांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते चला जाणून घेऊया.
बीच-पर्वत नाही तर देशातील ही तीर्थस्थळ Gen Z आणि Millennials मध्ये ठरत आहेत लोकप्रिय
ऋषिकेश, उत्तराखंड
दिल्ली किंवा उत्तर भारतात राहणाऱ्यांसाठी ऋषिकेश हे एक परफेक्ट ट्रिप डेस्टिनेशन आहे. येथे बसने सहज पोहोचता येते आणि ३०० ते ५०० रुपयांमध्ये धर्मशाळा किंवा हॉस्टेलमध्ये राहता येते. लक्ष्मण झूला, बीटल्स आश्रम आणि गंगेची आरती या ठिकाणांमुळे मनाला एक वेगळी शांती लाभते. साहस आणि अध्यात्म यांचा संगम असलेले हे ठिकाण एक दिवस तरी अनुभवायलाच हवे.
कसोल, हिमाचल प्रदेश
जर तुम्हाला डोंगर आणि निसर्ग आवडत असेल, तर कसोल ही एक अप्रतिम जागा आहे. दिल्लीहून व्हॉल्वो बसने सुमारे १००० ते १२०० रुपयांमध्ये प्रवास करता येतो. येथे कमी दरात गेस्ट हाऊस आणि होमस्टे मिळतात. पार्वती नदीकिनारी बसून चहाचा आस्वाद घेणे ही एक अविस्मरणीय अनुभूती असते. तीन दिवसांची ट्रिप साधारणपणे ५००० रुपयांत पूर्ण करता येते.
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
दार्जिलिंगचे चहा बाग, थंड वारे आणि पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य हे प्रवाशांना आकर्षित करते. टॉय ट्रेनची सफर आणि टायगर हिलवरून सूर्योदय पाहणे हे अनुभव अविस्मरणीय असतात. ट्रेन किंवा शेअर्ड कॅबने प्रवास आणि स्थानिक अन्न घेतल्यास हा प्रवास ५००० रुपयांत आरामात होऊ शकतो.
वाराणसी, उत्तर प्रदेश
भारताचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र असलेले वाराणसी हे कमी खर्चात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. घाटांवरील गंगा आरती, गल्लीतील चविष्ट अन्न आणि मंदिरांची भेट या सगळ्यांमुळे हा प्रवास खास बनतो. ४०० रुपयांत धर्मशाळा मिळतात आणि स्थानिक खाण्याचा खर्चही फार कमी असतो.
पॉंडेचेरी, तमिळनाडू
दक्षिण भारतातील पॉंडेचेरी हे फ्रेंच संस्कृतीचे दर्शन घडवणारे शहर आहे. शांत समुद्रकिनारे, रंगीत रस्ते आणि बाईकवर शहरभ्रमण हा अनुभव रोमांचक असतो. ट्रेनने प्रवास केल्यास खर्च कमी येतो आणि दोन-तीन दिवसांची ट्रिप ५००० रुपयांत पूर्ण करता येते.
पुरी आणि भुवनेश्वर, ओडिशा
पुरी बीचची सकाळ आणि जगन्नाथ मंदिराची शांतता मनाला सुखावते. येथे राहण्यासाठी आणि जेवणासाठी खूपच स्वस्त पर्याय आहेत. निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्म या तिन्हींचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.
बंगळूरजवळ फक्त 10,000 रुपयांत लुटा एडवेंचर ट्रिपची मजा; अशी करा 3 दिवसांची ट्रिप प्लॅन
कोडाईकनाल, तमिळनाडू
डोंगररांगांमध्ये वसलेले कोडाईकनाल हे दक्षिणेतील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे बस किंवा ट्रेनने सहज पोहोचता येते. तलाव, धबधबे आणि हिरवाई यामुळे येथील वातावरण नेहमीच प्रसन्न असते. स्वस्त होमस्टे उपलब्ध असल्यामुळे हा प्रवास प्रत्येकासाठी परवडणारा ठरतो. थोडक्यात, भारतात प्रवासासाठी पैसा नव्हे, तर मनातली इच्छा महत्त्वाची असते. योग्य नियोजन केल्यास कमी खर्चातही सुंदर आठवणी तयार करता येतात.