Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी आपल्या ५०व्या वाढदिवसाचा दिवस कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांसोबत साजरा केला. यावेळी त्यांनी ५० मुलांच्या उपचारासाठी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2026 | 11:00 AM
कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवसानिमित्त विवेक ओबेरॉय यांनी ५० कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारासाठी पुढाकार घेतला.
  • त्यांनी मुलांसोबत केक कापला, संवाद साधला आणि त्यांना लाल गुलाब व भेटवस्तू दिल्या.
  • मुलांसोबत विवेक ओबेरॉय यांनी विशेष व्हिंटेज कार राइडमध्ये सहभाग घेतला. मुलांनीही या राइडचा उत्साहाने आनंद घेतला.
राष्ट्रीय कर्करोग गुलाब दिनानिमित्त कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनतर्फे आयोजित विशेष उपक्रमात प्रसिद्ध अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी आपला ५०वा वाढदिवस कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांसोबत साजरा केला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ५० कर्करोगग्रस्त मुलांच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे विवेक ओबेरॉय यांनी कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांची भेट घेतली. त्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच त्यांना लाल गुलाब आणि भेटवस्तू दिल्या.

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

रुग्णांना नवी आशा, पाठिंबा देण्यासाठी उपक्रम

  • मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवताना विवेक ओबेरॉय यांनी वाढदिवसाचा हा विशेष दिवस सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीला समर्पित केला. यानंतर विवेक ओबेरॉय मुलांसोबत विशेष व्हिंटेज कार राइडमध्ये सहभागी झाले.
  • मुलांनी या राइडचा उत्साहाने आनंद घेतला. राष्ट्रीय कर्करोग गुलाब दिनानिमित्त वांद्रे-वर्ती सागरी सेतू लाल प्रकाशाने उजळवण्यात आला.
  • कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आशा, धैर्य, संवेदना आणि समाजाच्या पाठिंब्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
हे योगदान माझ्यासाठी अत्यंत विशेष बाब…

विवेक ओबेरॉय म्हणाले, “गेल्या दोन दशकांपासून सोबत काम करण्याचा मला अभिमान आहे. माझा ५०वा वाढदिवस कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांसोबत साजरा करणे आणि त्यांच्या उपचारासाठी योगदान देणे, ही माझ्यासाठी अत्यंत विशेष बाब आहे. प्रत्येक मुलाला स्वप्ने पाहण्याची, मोठे होण्याची आणि निरोगी आयुष्य जगण्याची मिळायला संधी हवी.”

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

रुग्णांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे…

सीपीएएच्या कार्यकारी संचालिका म्हणाल्या, “हे योगदान माझ्यासाठी अत्यंत विशेष बाब. विवेक ओबेरॉय यांनी आपला ५०वा वाढदिवस या मुलांसोबत साजरा करताना ५० मुलांच्या उपचारासाठी घेतलेला पुढाकार हा अत्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी आहे. कर्करोगाशी लढणाऱ्या प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.”

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Vivek oberoi 50th birthday cancer patients 50 children treatment support

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Birthday
  • cancer
  • vivek oberoi

संबंधित बातम्या

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
1

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
2

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
3

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.