रोज किती पावलं चालल्याने वजन कमी होते (फोटो सौजन्य - iStock)
दररोज आपण ऐकतो की चालणे आरोग्यासाठी चांगले आहे. लोक १०,००० ही एक निश्चित संख्या देखील मनात ठेवतात की जर त्यांनी इतकी पावले चालली तर त्यांचे आरोग्य उत्तमच राहणार याची ही हमी आहे. यासाठी लोक स्वतंत्रपणे स्मार्टवॉच खरेदी करतात किंवा त्यांच्या फोनवर रोज किती पावलं चालले याबाबत माहितीही ठेवतात वा नोंद घेतात. परंतु, द लॅन्सेट पब्लिक हेल्थच्या एका नवीन अहवालानुसार, १०,००० पेक्षा कमी पावले चालूनही चांगले आरोग्य राखता येते. गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी किती पावले पुरेशी असतील ते येथे जाणून घ्या.
काय सांगतो अभ्यास?
रोज किती पावलं चालावीत
लॅन्सेटच्या दिलेल्या अभ्यासानुसार, १०,००० नाही तर ७,००० पावले चालल्यानेही तुमचे आरोग्य चांगले राहते. १,६०,००० प्रौढांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही दररोज ७,००० पावले चाललात तर हृदयरोगाचा धोका २५ टक्क्यांनी कमी होतो, टाइप-२ मधुमेहाचा धोका १४ टक्क्यांनी कमी होतो, डिमेंशियाची शक्यता ३८ टक्क्यांनी कमी होते आणि नैराश्य २२ टक्क्यांनी कमी होते. अभ्यासात असेही म्हटले आहे की जर तुम्ही दररोज ४००० पावले चाललात तर तुमचे आरोग्य कोणतेही काम न करण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले असते.
30 मिनिटे चालणे ठेवते अनेक आजारांना दूर, जाणून घ्या रोज चालण्याचे फायदे
रोज चालण्याचे फायदे
रोज चालण्याने शरीराला काय फायदे मिळतात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.