Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केमिकल युक्त महागडे फेसवॉश वापरण्याऐवजी तांदळाच्या पाण्याने धुवा चेहरा, चेहरा होईल स्वच्छ आणि गोरापान

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पाण्याचा वापरू त्वचेवर कसा करावा, याबद्दल सांगणार

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 16, 2024 | 09:49 AM
तांदळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे

तांदळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसपॅक लावणे तर कधी पार्लरमध्ये जाणून फेशिअल किंवा केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे काहीकाळ त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेतली नाहीतर त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण त्वचेची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे त्वचा खराब होणार नाही आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य-istock)

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

त्वचेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्वचेला बाहेरून पोषण देण्यासोबतच आतूनसुद्धा पोषण द्यावे. यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. सुंदर त्वचेसाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर होईल. हल्ली महिला आणि मुलींना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. अशी त्वचा मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. तांदळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया.

रोजच्या आहारात भात खाल्ला जातो. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. जेवणात वापरला जाणारा तांदूळ त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. तांदळामध्ये पोषक तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळते. भात बनवताना तांदळातील पाणी फेकून दिले जाते, पण हेच पाणी फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा त्वचेसाठी वापर करू शकता. अनेकदा डॉक्टरही घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणून तांदळाचे पाणी वापरण्याचा सल्ला देतात.

तांदळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे:

तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे सुंदर त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तांदळाच्या पाण्यात विटामिन बी, विटामिन ई, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स किंवा पुरळ घालवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. शिवाय यामध्ये आढळून येणारे फेरूलिक अ‍ॅसिड आणि एलांटोइन सूर्याच्या किरणांपासून त्वचेचा बचाव करतात.

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवण्याचे फायदे:

तांदळाच्या पाण्यात आढळून येणारे नैसर्गिक गुणधर्म त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहेत. तांदळाच्या पाण्याने तोंड स्वच्छ केल्यास त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. तांदळाच्या पाण्याचे त्वचेवर कोणतेच गंभीर परिणाम दिसून येत नाहीत. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. शिवाय त्वचेसंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तांदळाचे पाणी मदत करते.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Wash your face with rice water instead of using expensive chemical face washes rice water benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 09:49 AM

Topics:  

  • home remedies
  • rice water

संबंधित बातम्या

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
1

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
2

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
3

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
4

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.