Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Firecracker Burn First Aid: दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे हात भाजल्यास घाबरून जाता हे घरगुती उपाय करावेत. हात, बोटे जास्त भाजल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तातडीने डाॅक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2026 | 11:35 AM
दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता 'हे' घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता 'हे' घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

Firecracker Burn First Aid: राज्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि उत्साहात दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळीकडे एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. फराळ, अंगणात सुंदर रांगोळी आणि फटाक्यांची आतिषबाजी करत सण साजरा केला जातो. पण उत्साहाच्या भरात लहान मुलांसह मोठेसुद्धा फटाके फोडण्याच्या नांदात हात, बोटे किंवा चेहरा भाजण्याची जास्त शक्यता असते. फटाक्यांमुळे हात, पाय किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवावर दुखापत झाल्यास तातडीने उपचार करणे फार आवश्यक असते. बर्न इंजरी झाल्यानंतर अनेक लोक खूप जास्त घाबरून जातात.घाबरल्यामुळे तातडीने कोणते उपचार करावेत, बऱ्याचदा सुचत नाही. त्यामुळे भाजल्यानंतर लगेच घाबरून न जाता योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. भाजल्यानंतर योग्य ते उपचार केल्यास त्वचेचे नुकसान कमी होते.(फोटो सौजन्य – AI)

Health Update: कोलेस्टेरॉलवरील संशोधनाला मोठा धक्का! हृदयविकाराचा धोका कमी करणाऱ्या औषधाची चाचणी अपयशी

फटाक्यांमुळे हात, बोटे किंवा चेहरा भाजल्यास तातडीने काय करावे:

फटाक्यांमुळे हात भाजल्यास सगळ्यात आधी हात थंड पाण्यात ठेवावा. वाहत्या थंड पाण्याखाली हात धरल्यास जळजळ कमी होण्यास मदत होईल. १० ते २० मिनिटं थंड पाण्याखाली हात धरून राहावे. भाजल्यानंतर बर्फ किंवा अतिथंड पाण्याचा अजिबात वापर करू नये. भाजलेल्या भागावर सूज आल्यास हातातील अंगठी, बांगडी, घड्याळ किंवा इतर घट्ट वस्तू शक्य तितक्या लवकर काढून टाकाव्यात. भाजल्यानंतर हाताला जखम झाल्यास घट्ट वस्तू काढण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. यामुळे जखम आणखीनच पसरू शकते.

त्वचेला चिकटलेली वस्तू जबरदस्तीने ओढून काढल्यास त्वचेच्या आतील थराचे नुकसान होऊ शकते. भाजल्यानंतर बऱ्याचदा टूथपेस्ट, तूप, खोबरेल तेल, हळद किंवा बर्फ लावला जातो. यामुळे जखम लवकर बरी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकते. जखमेवर लावलेले पदार्थ अडकून राहण्याची शक्यता असते. जखमेमध्ये पदार्थ अडकून राह्ल्यामुळे डॉक्टरांना सुद्धा जखमेवर योग्य उपचार करणे अवघड होऊन जाते.

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

भाजल्यानंतर थंड पाण्याने जखम स्वच्छ केल्यावर निर्जंतुक आणि त्वचेला न चिकटणारी पट्टी हलक्या हाताने लावावी. कापूस किंवा कोणतेही मलम किंवा कापड जखमेवर अजिबात लावू नये. त्वचेवर आलेले फोड किंवा जखमेवरील स्किन हाताने ओढून काढू नये. फटाक्यांमुळे हात भाजला असल्यास जखमेची तीव्रता तपासणे फारच आवश्यक आहे. त्वचा पांढरी, काळी किंवा खोलवर भाजलेली दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. चेहरा, डोळे किंवा मोठ्या भागावर भाजल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजल्यास सर्वात आधी काय करावे?

    Ans: फटाक्यांमुळे हात भाजल्यास घाबरून न जाता भाजलेला भाग त्वरित थंड किंवा साधारण तापमानाच्या वाहत्या पाण्याखाली किमान 20 मिनिटे धरावा. यामुळे त्वचेतील उष्णता कमी होण्यास आणि जखमेची तीव्रता कमी करण्यास मदत होते.

  • Que: भाजलेल्या त्वचेवर बर्फ लावणे योग्य आहे का?

    Ans: नाही. भाजलेल्या त्वचेवर थेट बर्फ किंवा बर्फाचे पाणी लावू नये. यामुळे त्वचेच्या पेशींना आणखी नुकसान होऊ शकते. त्याऐवजी साधे थंड वाहते पाणी वापरावे.

  • Que: भाजलेल्या हातावर फोड आल्यास काय करावे?

    Ans: भाजलेल्या जागेवर फोड आल्यास ते अजिबात फोडू नयेत. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जखम स्वच्छ, निर्जंतुक आणि न चिकटणाऱ्या ड्रेसिंगने हलके झाकावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Did you burn your hand on firecrackers during diwali dont panic try these home remedies for immediate relief sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Diwali
  • Fire
  • home remedies

संबंधित बातम्या

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक
1

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ
2

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ

Diwali Padwa 2026: दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात? जाणून घ्या राजा बली आणि वामन अवताराची कथा
3

Diwali Padwa 2026: दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा का म्हणतात? जाणून घ्या राजा बली आणि वामन अवताराची कथा

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी
4

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.