Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिर्याणीच काय हैदराबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

Hyderabadi Hariyani Chicken Recipe : विकेंडचा दिवस जवळ आलाय. या दिवशी फक्त आरामच केला जात नाही तर चवदार पदार्थांचा मुख्य म्हणजे नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. यंदा हटके काहीतरी ट्राय करा, घरी बनवा हरियाली चिकन.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 24, 2026 | 09:44 AM
बिर्याणीच काय हैद्रबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

बिर्याणीच काय हैद्रबादी हरियाली चिकन देखील आहे लाजवाब! एकदा खाल तर बोटंच चाटाल; विकेंड स्पेशल आजच नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • हैदराबादची मेजवानी सर्वांनाच वेड लावून ठेवते.
  • आतापर्यंत आपण हैदराबादी बिर्याणीचं नाव खूप ऐकलंय.
  • पण तुम्ही कधी हैदराबादी स्टाईल हरियाली चिकन बनवून खाल्लं आहे का?
चिकनप्रेमींची संख्या मोठी असल्यामुळे चिकनपासून विविध चविष्ट पदार्थ तयार केले जातात. चिकन टिक्का मसाला, तंदूरी चिकन, कढई चिकन, बटर चिकन, मुरग मुसल्लम, चिकन कोरमा, चिकन 65 आणि हैदराबादी चिकन बिर्याणी हे पदार्थ केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहेत. विशेषतः हैदराबादी बिर्याणी नॉनव्हेज प्रेमींना नकार देणे कठीण जाते. मात्र, बिर्याणीव्यतिरिक्त हैदराबादचा आणखी एक खास आणि चवीला अप्रतिम असा पदार्थ म्हणजे हरियाली चिकन. हिरव्या रंगाची क्रीमी ग्रेव्ही आणि मऊ, रसाळ चिकन यामुळे हा पदार्थ खास ठरतो. या लेखात आपण हैदराबादी हरियाली चिकनची सविस्तर रेसिपी जाणून घेणार आहोत.

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

हरियाली चिकन हे नावाप्रमाणेच दिसायला हिरवेगार असते. यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि पुदिन्याचा वापर केला जातो, ज्यामुळे ग्रेव्हीला नैसर्गिक हिरवा रंग मिळतो. यासोबतच साबुत आणि वाटलेले मसाले संतुलित प्रमाणात घातले जातात, त्यामुळे चव न खूप तिखट होते, न खूप फिकी. पारंपरिक पद्धतीने देशी तुपात बनवले जाणारे हरियाली चिकन हैदराबादमध्ये लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगी आवर्जून तयार केले जाते. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • कोथिंबीर – 50 ग्रॅम
  • पुदिना – 100 ग्रॅम
  • आले – 10 ग्रॅम
  • हिरव्या मिरच्या – 10 ग्रॅम
  • लसूण – 20 ग्रॅम
  • कांदा (तळलेला) – 50 ग्रॅम
  • काजू – 50 ग्रॅम
  • बदाम – 50 ग्रॅम
  • दही – 100 ग्रॅम
  • लिंबू – 1
  • धणे पावडर – 4 टेबलस्पून
  • लाल तिखट – 2 टीस्पून
  • हळद – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  •  तूप – 150 ग्रॅम
  • हिरवी वेलची – 6
  • लवंग – 8
  • मोठी वेलची – 5
  • दालचिनी – 2 काड्या
  • गरम मसाला – 1 टीस्पून
  • हिरवी वेलची पावडर – 2 टीस्पून
  • हे साहित्य साधारण 2 ते सव्वा 2 किलो चिकनसाठी पुरेसे आहे.
हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा अदरक-मधाचा चहा; प्रत्येक घोटात मिळेल आराम

कृती 

  • सर्वप्रथम कांदा बारीक चिरून कमी आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुऊन त्याच्या जाड काड्या काढून टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, तळलेला कांदा, काजू, बदाम आणि दही एकत्र घाला.
  • हे सर्व साहित्य एकत्र वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करा. गरज असल्यास 2–3 चमचे पाणी घालू शकता.
  • आता चिकन नीट धुऊन स्वच्छ करून त्यावर लिंबाचा रस पिळून चांगले मिक्स करा.
  • यानंतर चिकनमध्ये धणे पावडर, मीठ, लाल तिखट आणि हळद घालून मिसळा.
  • तयार केलेली हिरवी पेस्ट चिकनमध्ये घालून हाताने नीट मळा, जेणेकरून चिकनवर मसाल्याचे व्यवस्थित कोटिंग होईल.
  • एका पॅनमध्ये देशी तूप गरम करून त्यात हिरवी वेलची, मोठी वेलची, लवंग आणि दालचिनी घालून परतून घ्या.
  • वेलची थोडीशी ठेचून घ्या, म्हणजे तिचा सुगंध अधिक खुलतो.
  • हे गरम तूप आणि मसाले मेरिनेट केलेल्या चिकनमध्ये घाला.
  • आता मोठ्या पॅनमध्ये चिकन मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवायला ठेवा. चिकन पूर्णपणे मऊ आणि रसाळ होईपर्यंत शिजू द्या.
  • शेवटी गरम मसाला आणि हिरवी वेलची पावडर घालून हलकेच ढवळा.
  • तयार झालेले हैदराबादी हरियाली चिकन लच्छा पराठा, रुमाली रोटी, नान किंवा साध्या भातासोबत सर्व्ह करू शकता. याची क्रीमी, सुगंधी चव नक्कीच सर्वांना आवडेल.

Web Title: Weekend special hyderabadi hariyali chicken recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Hyderabad
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा ‘कोरीयन पॅनकेक’
1

Recipe : बोरींग पदार्थ सोडा, घरी बनवा हेल्दी आणि रुचकर चवीचा ‘कोरीयन पॅनकेक’

India History: कोणत्या भारतीय राज्याची राजधानी तीन वेळा बदलली? त्यावर अनेक राजवंशांनी राज्य केले, जाणून घ्या रंजक इतिहास
2

India History: कोणत्या भारतीय राज्याची राजधानी तीन वेळा बदलली? त्यावर अनेक राजवंशांनी राज्य केले, जाणून घ्या रंजक इतिहास

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’
3

Recipe : वजन सांभाळत खा चटपटीत! घरी बनवा कुरकुरीत पण चवदार ‘अ‍ॅव्होकॅडो पापडी चाट’

Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’
4

Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.