पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर पुळ्या आल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
शरीराच्या कोणत्याही भागावर लहान फोड किंवा मुरुम येणे आपण गांभीर्याने घेत नाही, परंतु जर पुरुषांच्या खाजगी भागात असे घडले तर ते चिंतेचे कारण असू शकते. हेल्थलाइनच्या मते, जेव्हा आपल्या शरीरावरील छिद्र हे तेल, बॅक्टेरिया किंवा मृत त्वचेच्या पेशींनी बंद होतात तेव्हा लिंगावर मुरुमे येतात. या मुरुमांमध्ये पू असू शकतो, ते सुरूवातीला कोमल वाटू शकतात किंवा कडक गाठीसारखे दिसू शकतात.
अनेकदा असे आलेले मुरूम वा पुळ्या या सहसा स्वतःहून निघून जातात, परंतु काही परिस्थितींमध्ये डॉक्टरांना संपर्क गाठण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुरूषांनी प्रायव्हेट भागाला पुळी आली असल्यास आणि त्रास होत असल्यास स्वतःहून ती फोडू नये. जाणून घेऊया अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
पुरूषांच्या 5 वाईट सवयींमुळे लहान होतो प्रायव्हेट पार्ट, या चुका कधीच करू नका
पुरुषांच्या गुप्तांगांवर मुरुम येण्याची कारणे
शरीरावर कुठेही मुरुमे येऊ शकतात, ज्यामध्ये लिंगाचाही समावेश आहे, ज्याचे प्रमुख घटक खाली आम्ही सांगितले आहेतः
जरी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले नसले तरीही तुमच्या लिंगावर मुरुमे येऊ शकतात, परंतु लैंगिक संक्रमित आजार (STIs) देखील अशी लक्षणे निर्माण करू शकतात. जर तुम्हाला खात्री नसेल, तर कोणतीही गंभीर स्थिती टाळण्यासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अशा मुरुमांवर काय उपचार आहेत?
पुरुषांच्या गुप्तांगांवरील मुरुमांपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना तसेच राहू देणे आणि थोडासा त्रास सहन करणे आणि याशिवाय प्रायव्हेट पार्टची योग्य स्वच्छता राखणे. अशा पुळ्या फोडणे टाळा कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि अधिक ब्रेकआउट होऊ शकतात. चेहऱ्यावरील मुरुमांपेक्षा वेगळे, बेंझॉयल पेरोक्साइड आणि सॅलिसिलिक अॅसिडसारखे ओव्हर-द-काउंटर उपचार संवेदनशील प्रायव्हेट पार्टच्या क्षेत्रासाठी खूप कठोर असतात. तुम्हाला जर या भागावर मुरुमे कायम राहिल्याचे दिसून येत असेल आणि जास्त त्रास होत असेल तर त्वचारोगतज्ज्ञ बॅक्टेरियाच्या संसर्गासाठी ड्रेनेज किंवा उपचारांची शिफारस करू शकतात, जसे की गंभीर मुरुमांसाठी अँटीबायोटिक्स किंवा आयसोट्रेटिनोइन, याचा तुम्ही वापर करून त्रास कमी करू शकता
मुरुमांसारख्या दिसणाऱ्या समस्या
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.