
मुलांमधील ब्रेन ट्युमरची लक्षणे कशी ओळखावीत (फोटो सौजन्य - iStock)
जेव्हा एखाद्या मुलाला ब्रेन ट्यूमरचे निदान होते तेव्हा वेळीच उपचार केल्यास त्याचा अमूल्य जीव वाचविता येतो. विलंब न करता मुलांमधील ही धोक्याची लक्षणे ओळखणे आणि त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरुक राहण्याची आवश्यकता आहे.
ब्रेन ट्यूमर ही मेंदूतील असामान्य पेशींची वाढ आहे आणि ती कर्करोगजन्य असू शकते. प्रौढांप्रमाणेच, मुलांमध्ये ब्रेन ट्यूमर देखील एक सामान्यपणे आढळून येणारा आजार आहे. हे खरंय की ब्रेन ट्यूमर लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च विकृती आणि वाढत्या मृत्युदरास कारणीभूत ठरते. मात्र वेळीच निदान आणि उपचार मुलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. पालकांनी मुलांमधील ब्रेन ट्युमरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी. डॉ. शिजी चालीपट, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट,अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार
मुलांमध्ये ब्रेन ट्यूमरची चिन्हे आणि लक्षणे
काय आहेत उपाय
ब्रेन ट्युमरचे उपचार हे ट्यूमरचा प्रकार, आकार आणि स्थानानुसार बदलतात आणि त्यात शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपीचा समावेश असू शकतो. संभाव्य लक्षणे ओळखण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते, जेणेकरून त्यांच्या मुलाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचे जीवनमान सुधारु शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.