Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारचौघांमध्ये हसण्याची लाज वाटते? मग ‘हे’ उपाय करून कमी करा दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा, दात दिसतील पांढरेशुभ्र

दातांवर साचून राहिलेल्या पिवळ्या थरामुळे अनेकदा चारचौघांमध्ये गेल्यानंतर हसताना किंवा बोलताना लाज वाटू लागते. त्यामुळे आम्ही तुम्हाला दातांवरील पिवळे कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा. यामुळे दात स्वच्छ होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2025 | 09:45 AM
दातांवर पिवळा थर साचून राहण्याची कारणे

दातांवर पिवळा थर साचून राहण्याची कारणे

Follow Us
Close
Follow Us:

दैनंदिन आहारात साखरयुक्त पदार्थांचे अतिसेवन आणि तेलकट तिखट पदार्थांचे सतत सेवन करून दातांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे दातांवर पिवळेपणा साचणे, कीड लागणे, दात अचानक पडणे, हिरड्यांसंबंधित समस्या उद्भवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर दातांचे आरोग्य पूर्णपणे खराब होऊन जाते. दातांवर साचलेला पिवळा थर कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा पिवळेपणा कमी होत नाही. दातांवरील पिवळेपणामुळे चारचौघांमध्ये गेल्यानंतर हसण्याची किंवा बोलण्याची अनेकदा लाज वाटू लागते. दातांचे आरोग्य खराब झाल्यानंतर श्वसन मार्गाची दुर्गंधी येण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – iStock)

वयाच्या १०० वर्षात हृदय राहील निरोगी! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फॉलो करा ‘हे’ सोपे उपाय, हृदय राहील कायम सुधृढ

दातांवर पिवळा थर किंवा पांढऱ्या रंगाचा थर साचून राहिल्यानंतर तो कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या टूथपेस्ट लावल्या जातात, तर कधी घरगुती उपाय करून दात स्वच्छ केले जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने उपाय केल्यामुळे दातांवरील पिवळेपणा कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतं जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे घरगुती उपाय योग्य पद्धतीने केल्यास दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी होऊन दात स्वच्छ होतील आणि दातांची दुर्गंधी कमी होईल.

दातांवर पिवळा थर साचून राहण्याची कारणे:

  • दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यामुळे दातांवर पिवळा थर साचून राहतो.
  • ऍसिडिक पदार्थांचे अतिसेवन, साखर युक्त पदार्थ, चहा कॉफीचे अतिसेवन केल्यामुळे दातांवर पिवळा थर साचून राहतो आणि हिरड्या खराब होतात.
  • दातांचा वरचा थर खराब झाल्यामुळे दात पिवळे दिसू लागतात.
  • चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे दात खराब होऊन जातात.

दातांवर पिवळा थर साचून राहण्याची कारणे

दात स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय:

दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय केल्यास टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा टाकून दात स्वच्छ करावे. यामुळे दातांवर साचून राहिलेला पिवळेपणा कमी होऊन दात स्वच्छ दिसतील. टूथपेस्ट आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण दातांवर लावल्यामुळे पिवळेपणा कमी होण्यासोबतच प्लाकसुद्धा कमी होऊन जातो. याशिवाय दातांमध्ये लागलेली कीड नष्ट होते. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच बेकिंग सोड्याचा वापर करताना जास्त प्रमाणात करू नये. टूथपेस्ट घेतल्यानंतर त्यावर चिमूटभर बेकिंग सोडा घेऊन दात स्वच्छ करावे.
अमृतापेक्षा कमी नाही स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला, दुधात मिसळून प्या; मुळापासून दूर होईल सांधेदुखीचा त्रास

इतर घरगुती उपाय:

  • दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता. खोबरेल हातावर घेऊन दातांवर फिरवून काहीवेळाने दात स्वच्छ करून घ्यावी. यामुळे दातांवर साचलेला पिवळेपणा कमी होईल आणि दात स्वच्छ दिसतील.
  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून गुळण्या केल्यास दातांवर साचून राहिलेल्या पिवळेपणा सोबतच तोंडाची दुर्गंधी कमी होऊन दात स्वच्छ आणि चमकदार दिसतील.
  • दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पेरूच्या पानांचा किंवा कडुलिंबाच्या काढीचा वापर करू शकता. यामुळे दात पांढरेशुभ्र आणि चमकदार दिसतील.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What causes teeth to turn yellow what care should be taken to prevent yellowing of teeth home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • teeth home remedies
  • teeth problems
  • teeth tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.