पित्ताशयातील खडे ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे.जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. पित्ताशयामध्ये हे छोटे, कडक साठे/दगड तयार होऊ शकतात, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि गुंतागुंत निर्माण होतात. तथापि, या स्थितीबद्दल असंख्य समज आणि गैरसमज आहेत, ज्यामुळे गोंधळ आणि चुकीची माहिती मिळते. या लेखात, आम्ही पित्ताशयाच्या दगडांच्या आसपासच्या काही प्रचलित मिथकांचा शोध घेऊ, गैरसमज दूर करू आणि या स्थितीबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अचूक माहिती प्रदान करू.
फक्त वयस्कर लोकांनाच पित्ताशयाचे खडे होतात. हा एक गैरसमज आहे आणि वास्तविक पाहता वय हा जोखमीचा घटक असला तरी, पित्ताशयातील खडे लहान मुले आणि तरुण प्रौढांसह सर्वच वयोगटातील लोकांमध्ये होऊ शकतात.चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पित्ताशयाचे खडे होतात. हा देखील एक गैरसमज आहे. उच्च चरबीयुक्त आहार हा पित्ताशयातील खडे तयार करण्यास कारणीभूत ठरू शकतो, परंतु हेच एकमेव कारण नाही. आनुवंशिकता, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, जलद वजन कमी होणे आणि मधुमेह किंवा यकृत रोग यासारख्या काही वैद्यकीय परिस्थिती देखील यास कारणीभूत ठरतात.
[read_also content=”तुमचं मूल प्रत्येक बाबतीत होतंय हळवं, असा बनवा कणखर फॉलो करा टिप्स https://www.navarashtra.com/lifestyle/follow-these-tips-to-make-your-child-feel-good-in-every-aspect-nrsk-534048.html”]
पित्ताशय काढून टाकल्याने वजन वाढते हा एक गैरसमज असून वस्तविकता पित्ताशय काढून टाकल्याने वजन वाढण्याशी थेट संबंध नाही. शस्त्रक्रियेनंतर कमी झालेल्या शारीरीक हलचालीमुळे वजन वाढू शकते. संतुलित आहार आणि व्यायाम शस्त्रक्रियेनंतरचे वजन नियंत्रित राखण्यास मदत करू शकतो.लहान आकाराच्या खड्यांना शस्त्रक्रियेची गरज नसते. ही एक गैरसमज असून पित्ताशयातील अनेक लहान खडे अधिक धोकादायक असतात कारण ते सामान्य पित्त नलिका किंवा स्वादुपिंडाच्या नलिकेमध्ये सरकतात. यामुळे कावीळ किंवा तीव्र पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचा दाह होऊ शकतो. तुम्हाला पित्ताशयातील खड्यांची समस्या असल्यास लवकरात लवकर वैद्यकिय तज्ज्ञांची भेट घ्या.
पित्ताशयातील खडे औषधोपचार किंवा नैसर्गिक उपायांनी विरघळतात हा एक गैरसमज आहे.औषधे आणि नैसर्गिक उपायांमुळे काही व्यक्तींना लक्षणे व्यवस्थापित करण्यात किंवा भविष्यात खडे तयार होण्यास प्रतिबंध करण्यात मदत होऊ शकते, परंतु ते सामान्यतः पित्त खडे विरघळू शकत नाहीत. पित्ताशयाच्या खड्यांसाठी अनेकदा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते.






