aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा... सौजन्य : सोशल मिडीया
देशभर गाजलेला दिशा सालियन प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना 500 कोटींची नोटीस पाठवली होती. या नोटीसीला अखेर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिल्याचे समोर येत आहे. नोटीशीला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंकडून सतिश सालियान यांच्या कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी हे उत्तर दिल्याचे सांगण्यात येते. सतिश सालियान यांनी पाठवलेल्या 500 कोटींच्या नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावत, हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटलं आहे.
नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले आहेत. 16 सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतिश सालियान यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही, असा दावा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. पोस्टमधील कोणतंही विशिष्ट वाक्य सतीश सालियन यांच्याकडे निर्देश करत नसल्याचंही त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.
वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
संबंधित प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांवर अधिकृत तपास होण्याची गरज आहे. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सतिश सालियन यांच्याविरोधात बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. 26 पानांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी सतिश सालियन यांच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.
आता आदित्य ठाकरे यांच्या या उत्तरावर सतिश सालियन कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






