फोटो सौजन्य सोशल मिडिया
भाज्यांच्या वाढत्या दरामुळे रोज वापरात येणारे कांदा आणि बटाटे सुद्धा महाग झाल्याचे पाहला मिळत आहे.या मध्ये हिरव्या भाज्या सुद्धा महाग झाल्या आहेत. या मुळे हिरव्याभाज्याच्या किंमती वाढल्या असून त्या दोन पट्टीने वाढल्या आहेत.
बाजारात टोमॅटो 40 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे, काही दिवसांपूर्वी 30- 40 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा, आता मात्र 80 रुपयांनी विकला जात आहे. यात आले- लसूणाच्या किंमती मध्ये देखिल लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. भेंडी, काकडी यांसारख्या इतर हिरव्या भाज्यामध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे.
घाऊक आणि किरकोळ भावांबद्दल बोलायचे झाल्यास बाजारात १२ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे बटाटे आता किरकोळ बाजारात पोहोचे पर्यंत २० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. बाजारात ३६-४५ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे कांदे आता किरकोळ बाजारात ७५-८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत.
विक्रेत्यांच्या मते खराब हवामान आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आणि पुरवठा विस्कळीत झाला, ही भाववाढीची मुख्य कारणे आहेत. बाजारात हिरव्या भाज्यांचा पुरवठा कमी झाल्यामुळे ही भाववाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे येत्या काही दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बाजारात सामान्य दरात कोणतीही भाजी उपलब्ध नाही. मोसमी कोबी यायला सुरुवात झाली आहे, पण असे असूनही कोबीचा भाव अजूनही ६० ते ८० रुपये प्रति किलो आहे. दरम्यान, मोहरी आणि पालक १०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. लिंबाचे भाव गगनाला भिडले असून ते ५०० ते ७०० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. कोथिंबीर ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. भाजीपाल्याच्या या वाढलेल्या भावांमुळे त्यांच्या घरगुती बजेटवर ताण येत आहे.
Onion Market : कांदा 24 रुपये दराने मिळणार; केंद्राकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय






