
कधी कधी काय होतं प्रेमविवाह करताना फक्त आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून लग्न केलं जातं आणि arrange marriage करताना बरेचदा आई वडील कसे आहेत, त्यांचं घर कसं आहे या गोष्टीचा विचार केला जातो. पण खऱ्या अर्थाने लग्न करण्यापूर्वी पाच आर्थिक गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. प्रेमाने पोट भरत नाही आपल्याबरोबर जोडीदाराची जबाबदारी देखील उचलता यायला पाहिजे.
काळ बदलत गेला तसं लग्नाबाबत आण करिअरबाबत तरुण पिढीचे विचार बदलत गेले. तुम्ही प्रेमविवाह करा किंवा अरेंज मॅरेज पण अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही तुमच्या होणाऱ्या जोडीदाराकडून या पाच आर्थिक गोष्टींची खात्री करुन घ्यायला पाहिजेत.
Cibil Score
लग्नाआधी याचा का विचार करायला पाहिजे तर तुम्ही लग्न झाल्यानंतर पुढे काही वर्षांमध्ये जर घर घेणार असाल किंवा आपला जोडीदार कशा पद्धतीने पैसे खर्च करतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला दोघांचाही cibil score माहिती असणं खूप गरजेचं आहे.
कर्ज
तुम्ही लग्न करताना तुमचा जोडीदार किंवा जो होणारी मुलगी असेल, मुलगा असेल, जो कोणी असेल त्यांनी कर्ज घेतलं आहे का याबाबत स्पष्ट बोला. आता म्हणजे नक्की काय तर,स लग्नापूर्वी मुलगा किंवा मुलीने कोणतं कर्ज घेतलं नाहीये ना हे त्यांना तुम्ही नम्रपणे आणि स्पष्ट विचारा. कर्ज घेणं ही गोष्ट चुकीची नाही पण त्याबाबत माहिती असायला हवी. Education, personal, car, business loan कोणतंही कर्ज असू द्या, त्यामध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे.
आपल्या जोडीदाराची खर्च करण्याची पद्धत
ज्याच्याबरोबर आपण आयुष्यभर राहणार असू त्य़ाची खर्च करण्याची पद्धत कशी आहे हे कळणं गरजेचं आहे. तुम्ही ज्याच्याबरोबर संसार करणार आहात त्यांच्या खर्चाच्या पद्धती वा सवयी कशा आहेत, budget नुसार खर्च करता की पैसे उधळता हे देखील पाहायला हवे. याशिवाय कोणत्याही गोष्टी विकत घेताना तुमचा जोडीदार नक्की कसा विचार करतो हे देखील लग्नाआधी जाणून घेणं गरजेचं आहे.
ध्येय
तुम्ही दोघांनीही एकमेकांच्या ध्येयांबाबत बोलायला पाहिजे. आता म्हणजे नक्की काय तर तुमची गुंतवणूक कोणती आहे? Equity आहे, shares आहेत, mutual funds आहेत. यामध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे हे देखील दोघांनी जाणून घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये लाज बाळगण्याची कोणतीही गरज नाही.
सेविंग्ज
Emergency साठी तुम्ही कोणत्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे हे दोघांनाही माहित असायला हवं. कारण भविष्यामध्ये काय होणार आहे हे आपल्याला नक्कीच माहित नसतं. त्य़ामुळे आर्थिक बाबीची चर्चा करणं लग्नाआधी खूप गरजेचं आहे. या पाच आर्थिक गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या होणाऱ्या जोडीराला लग्न होण्यापूर्वी स्पष्ट असणं गरजेचं आहे.