(फोटो सौजन्य: Instagram)
बॅग कशी बनवली गेली?
संघाच्या दाव्यानुसार, या बॅगला तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले चामडे हे थेट डायनासोरपासून मिळवलेले नव्हते तर ते प्राचीन प्रथिनांच्या विखंडित कोलेजनपासून बनवण्यात आले आहे. हे करण्यासाठी त्यांनी टी. रेक्सच्या जीवाश्मांमधून प्रथिनांचे लहान तुकडे काढले. त्यानंतर नवीन कोलेजन तयार करण्यासाठी हे तुकडे एका अज्ञात प्राण्याच्या पेशींमध्ये टाकण्यात आले. अखेर, या कोलेजनवर प्रक्रिया केल्यानंतर त्याचे चामड्यात रुपांतर करण्यात आले. असं करताना अनेक तांत्रिक आव्हानांना संघाला समोर जावं लागलं पण त्यांनी यात यश मिळवलंच असं संघाच म्हणणं आहे.
कोलेजनपासून चामडे तयार करणाऱ्या लॅब-ग्रोन लेदर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चे कॉनन म्हणाले की, टीं. रेक्सच्या संबंधांमुळे या कापडाला एक असाधारण गुणवत्ता प्राप्त झाली आहे जी केवळ पर्यावरणीय निकषांपुरतीच मर्यादित नाही. हा केवळ चामड्याला पर्यावरणपूरक पर्याय नाही तर एक सुधारित तांत्रिक पर्याय आहे असं ते म्हटले.
उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो
या प्रकल्पाबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात?
अनेक शास्त्रज्ञ या प्रक्लपाला घेऊन थोडे गाेंधळात आहेत. मेलानी ड्युरिंग, एक डच वेर्टेब्रेट पेलियंटोलॉजिस्ट म्हणतात की, डायनासोरच्या हाडांमध्ये आढळणारे कोलेजन केवळ लहान तुकड्यांमध्येच टिकून राहते, ज्यामुळे खऱ्या चामड्याची प्रतिकृती बनवणे जवळजवळ अशक्य होते. मेरीलँड विद्यापीठातील जीवाश्मशास्त्रज्ञ थॉमस आर. होल्ट्झ ज्युनियर म्हणतात की, टी. रेक्सच्या हाडांमध्ये आढळणारे कोलेजन त्वचेपासून आलेले नाही. जरी प्रथिनांची जुळणी परिपूर्ण असली तरी, त्यातून खऱ्या चामड्यासारखी रचना आणि मजबुती मिळणार नाही.






