Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lung Care Tips : फुफ्फुसांचे आरोग्य राखायचे आहे? दररोज करा ही 4 सोपी योगासने

Lung Care Tips : राज्यातील वाढत्या वायुप्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होत असून खोकला, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी चार योगासनांचा सराव करा.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 12, 2026 | 09:39 PM
Improve Breathing and Respiratory Health During Air Pollution ( वायू प्रदूषणाच्या काळात श्वसनक्रिया आणि श्वसन-आरोग्य सुधारा) फोटो सौजन्य AI

Improve Breathing and Respiratory Health During Air Pollution ( वायू प्रदूषणाच्या काळात श्वसनक्रिया आणि श्वसन-आरोग्य सुधारा) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

 

  • हस्त उत्तानासन 
  • ताडासन 
  • अर्धचंद्रासन 
  • उष्ट्रासन 
Lung Care Tips : सध्या राज्यात वायु प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत या परिस्थिती मध्ये श्वास घेण्यास त्रास होतोय. आपल्या शरिराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगासन करणे नेहमी फायदेशीर ठरू शकते. यासाठी करा या 4 सोप्या गोष्टी.

सध्या मुंबई आणि इतर शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे.या वातावरणात श्वास घेणअयास लोकांना त्रास होतोय. अशा प्रदूषित हवेत राहिल्याने खोकला, घशाला खवखव, श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू लागला आहे.

आजारी माणसांसाठी विशेषतः दमा किंवा श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास जाणवू लागल्याने फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

यासाठी तुम्ही योगाभ्यासाची मदत घेऊ शकता. काही योगासनांमुळे शरीराची लवचिकता, श्वसनाचा सराव आणि शरीराचा समतोल सुधारण्यास मदत होते. अशीच 4 योगासने कोणती आणि ती कशी करावीत, जाणून घेऊया.

हस्त उत्तानासन

हे आसन करताना सर्वप्रथम योगा मॅटवर सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर ठेवा आणि गुडघे सरळ ठेवा. आता दीर्घ श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. दोन्ही तळहात एकमेकांना जोडा. त्यानंतर शरीराची क्षमता लक्षात घेऊन हात आणि छातीचा भाग हळूहळू मागच्या दिशेने न्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा सरळ उभे राहा.

World Pneumonia Day: हवेतील प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो, तज्ज्ञांचा इशारा

ताडासन

ताडासन करण्यासाठी सर्वातआधी आपले दोन्हा पाय एकमेकांना जोडून सरळ उभे करावे. मग हळूहळू टाचा जमिनीवरून वर उचलावे आणि पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा प्रयत्न करावे.

त्याचवेळी दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या आणि हातांची बोटे एकमेकांत गुंफा. शरीराचा तोल सांभाळत दीर्घ श्वास घ्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू टाचा जमिनीवर ठेवा आणि हात खाली आणा.

अर्धचंद्रासन

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून सरळ उभे राहा. त्यानंतर उजव्या बाजूला शरीर वाकवा. उजवा हात जमिनीवर टेकवा आणि डावा हात वरच्या दिशेला घ्या. या वेळी शरीराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीत राहून सामान्य स्थितीत या. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही या आसनाचा सराव करा.

उष्ट्रासन

या आसनाला कॅमल पोझ म्हणतात. यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर गुडघ्यांवर बसा. दोन्ही गुडघ्यांमध्ये योग्य अंतर ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या, हळूहळू शरीर मागच्या बाजूला वाकवा.

दोन्ही हातांनी पायांच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. यावेळी छातीचा भाग वरच्या दिशेने उचला आणि मान शरीराच्या क्षमतेनुसार मागे न्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर सावकाश पूर्व स्थितीत आणा.

पुरुषांच्या फॅशनमध्ये दागिन्यांचा नवा ट्रेंड! चेन, ब्रेसलेट आणि अंगठ्यांना दैनंदिन वापरात वाढती पसंती

Web Title: 4 yoga asanas for lung health during air pollution sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • Healthy life
  • healthy lungs
  • helathy lifestyle
  • yogasana

संबंधित बातम्या

Lungs Cancer: फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, कोणत्याही क्षणी ओढवेल मृत्यू
1

Lungs Cancer: फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, कोणत्याही क्षणी ओढवेल मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.