Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोहगडावर इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक… डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

Dark Tourism : केतन अग्रवाल हत्याकांडानंतर लोहगडावर पर्यटकांची संख्या वाढू लागली आणि यातूनच डार्क टूरिजमचा ट्रेंड पुन्हा सुरु झाला. हा ट्रेंड नक्की काय आहे आणि अशा ठिकाणांना भेट देण्यामागे पर्यटकांचे नेमके कारण काय ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 08:26 AM
लोहगडमध्ये इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक... डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

लोहगडमध्ये इतिहासाच्या नाही तर सिया पॉईंटच्या शोधत आहेत पर्यटक... डार्क टुरिजमचा हा ट्रेंड नक्की आहे तरी काय?

Follow Us
Follow Us:
  • एका चर्चित घटनेनंतर ऐतिहासिक किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढल्याचा दावा केला जात आहे.
  • सोशल मीडियाचा पर्यटनाच्या निवडीवर मोठा प्रभाव पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
  • या बदलामागे कोणता जागतिक पर्यटन ट्रेंड आहे आणि त्याचा अर्थ काय, जाणून घ्या.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण सध्या देशभर फार चर्चेत आहे. लोहगडावर ट्रेकिंगचे कारण देत सिया गोयलने केतनला लोहगडाच्या कड्यावरुन ढकलले. दोघांचाही साखरपुडा झाला होता आणि काही महिन्यांतच त्यांचे लग्न होणार होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते ज्यामुळे प्रियकर चेतनसोबत मिळून तिने केतनच्या हत्येचा कट रचला. हे प्रकरण सध्या चांगलंच गाजत असून आता लोहगडावर यूजर्सची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ज्या लोहगडाला पूर्वी लोक इतिहासाच्या दृष्टीकोणातून पाहण्यासाठी भेट देत होते तोच लोहगड आता सिया गोयल पाॅईंट नावाने पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे.

एका रिपोर्टनुसार, मागील काही काळापासून लोहगडावर पर्यटकांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार, यात अधिकतर लोक इतिहास जाणून घेण्यासाठी नाही तर सिया पाॅईंट पाहण्यासाठी लोहगडावर गेले. हे तेच ठिकाण आहे जिथून सियाने केतनला ढकलले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण पर्यटनातील हे बदल काही पहिल्यांदाच घडून आले नाहीत. जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अपघात, खून, युद्ध किंवा मोठ्या दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली. पर्यटन क्षेत्रात या ट्रेंडला ‘डार्क टूरिजम’ असे म्हटले जाते. चला हे नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

ट्रेंड आहे फार जुना

डार्क टूरिजमच म्हणजे अशा ठिकाणांना भेट देणे जिथे गंभीर किंवा दु:खद घटना घडल्या आहेत. यात चर्चित मर्डर, युद्ध किंवा नैसर्गिक दुर्घटना किंवा अशा काही घटना ज्यामुळे इतिहासात बदल घडून आला यांचा समावेश होतो. तथापि इथे आलेल्या प्रत्येक पर्यटकाचा उद्देश सारखा नसतो. काही जण इतिहास समजूण घेण्यासाठी ठिकाणाला भेट देतात, काही जण घटनास्थळाचा अनुभव घेण्यासाठी येतात, तर काहीजण हे फक्त ते डेस्टीनेशन सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे म्हणून त्या ठिकाणाला भेट देतात. म्हणजेच प्रत्येत व्यक्तीचे ठिकाणाला भेट देण्यामागचे कारण काहीसे वेगळे असते.

लोहगड सर्वात ताज उदाहरण

साधारण ३०० वर्षे जुना लोहगडा तेथील मजबूत तटबंदी, मराठा इतिहास आणि विंचू कडासाठी ओळखला जात होता. पावसाळ्यात येथे मोठ्या संख्येने ट्रेकर्ससुद्धा येतात. पण आज सोशल मिडियावर या किल्ल्याची ओळख याच्या इतिहासासाठी नाही तर इथे घडलेल्या क्राईममुळे जास्त चर्चेत आहे. एकेकाळी आपल्या इतिहासासाठी ओळखला जाणाऱ्या या किल्ल्याची ओळख आता क्राईम स्पाॅट म्हणून झाली आहे.

अपघात स्थळांना पर्यटक का भेट देतात?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुर्घटना झालेल्या ठिकाणी लोक इतक्या आवडीने का भेट देतात. तर सायकॉलजीमध्ये याला ‘Morbid Curiosity’ असे म्हटले जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर अशा घटनांविषयी ही एक नैसर्गिक जिज्ञासा आहे, जी आपल्याला अशा ठिकाणी घडलेल्या घटनांविषयी आणखी जाणून घेण्यास भाग पाडते. हेच कारण आहे की, काही लोकांना फक्त या घटनांची माहिती वाचून समाधान मिळत नाही तर त्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणाला पाहण्याची ओढ लागलेली असते.

फक्त गुन्हेगारीपर्यंत मर्यादित नाही डार्क टूरिजम

आता केतन अग्रवाल प्रकरण बघता तुम्हाला डार्क टूरिजम म्हणजे फक्त क्राईम स्पाॅट्सना भेट देणे असं वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. याचे जग खूपच व्यापक आहे. डार्क टुरिजममध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • War Tourism – युद्धस्मारके आणि रणांगणे
  • Disaster Tourism – नैसर्गिक किंवा औद्योगिक आपत्ती असलेली ठिकाणे
  • Crime Tourism – प्रसिद्ध गुन्ह्यांशी संबंधित ठिकाणे
  • Prison Tourism – ऐतिहासिक तुरुंग
  • Ghost Tourism – रहस्य आणि भुतांच्या कथांशी संबंधित ठिकाणे
भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

स्वत:ला प्रश्न विचारा

काही महिन्यांनंतर कदाचित लोक ही घटना विसरतील आणि लोहगड पुन्हा त्याच्या समृद्ध इतिहासासाठी, रोमांचक ट्रेकिंगसाठी आणि विंचू कड्यासाठी ओळखला जाईल. मात्र, या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केला आहे, आपण एखाद्या पर्यटनस्थळी त्याचा इतिहास, संस्कृती आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी जातो की ते ठिकाण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे म्हणून? पुढच्या वेळी तुम्ही पर्यटनाला जाल, तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा – त्या ठिकाणी जाण्यामागचं तुमचं खरं कारण काय आहे?

Web Title: What is dark tourism lohagad fort ketan agarwal murder case sparks tourist interest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • fort
  • Ketan Agrawal Murder Case
  • travel news

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
1

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Ketan Agarwal Muder Case: सीसीटीव्हीतील संशयित चेतनच? लोहगडावर सीन रिक्रिएशन, गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार
2

Ketan Agarwal Muder Case: सीसीटीव्हीतील संशयित चेतनच? लोहगडावर सीन रिक्रिएशन, गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
3

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Ketan Agarwal murder case : श्रीवास्तवांनी धाडलेली नोटीस,साहिल गोयलला आलीच नाही,वकील दुशिंगांचा दावा
4

Ketan Agarwal murder case : श्रीवास्तवांनी धाडलेली नोटीस,साहिल गोयलला आलीच नाही,वकील दुशिंगांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.