Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

A1 And A2 Milk : तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ? हा प्रकार नेमका आहे तरी काय ?

A1 And A2 Milk : गेल्या काही वर्षांपासून दुधामध्ये A1 आणि A2 याबाबत एक वाद सुरू आहे. आता काही जणं A2 दुधाला आरोग्यदायी मानतात पण काही जणं असं म्हणतात की हा एक वेगळाच trend आहे. पण हे A1 आणि A2 म्हणजे नेमकं काय?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 16, 2026 | 01:24 PM
A1 And A2 milk

A1 And A2 milk

Follow Us
Close
Follow Us:
  • तुम्ही कोणतं दुध पिता A1 की A2 ?
  • हा प्रकार नेमका आहे तरी काय ?
A1 And A2 Milk  : अन्नला पूर्णब्रम्ह असं म्हटलं जातं. पण याच बरोबर दुधाला देखील पूर्ण अन्न म्हटलं जातं. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असलात तरी दूध तुम्हाला फक्त आणि फक्त आरोग्यदायी फायदेच देतं. म्हणूनच दुधाला नेहमीच आपल्या आहारातील एक आवश्यक भाग मानलं गेलंय. अगदी लहान मुलांपासून सगळ्याच वयोगटापर्यंत दूध पिण्याचा सल्ला doctor देत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून दुधामध्ये A1 आणि A2 याबाबत एक वाद सुरू आहे. आता काही जणं A2 दुधाला आरोग्यदायी मानतात पण काही जणं असं म्हणतात की हा एक वेगळाच trend आहे. पण हे A1 आणि A2 म्हणजे नेमकं काय? या दोन्ही दुधामध्ये नक्की काय फरक असतो? याच्यातलं अंतर काय आहे? या दोन दुधांमध्ये कोणतं दूध पचायला जास्ती सोपं आहे? आणि कोणी हे दूध प्यावं असेही प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील ना मग आता याची सविस्तर उत्तरं जाणून घेऊयात.

 

आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की A1 आणि A2 या दुधामधला नक्की फरक काय आहे? A1 आणि A2 दुधामधील फरक त्यामध्ये असलेल्या एका विशिष्ट प्रथिनामध्ये आहे. दुधामध्ये बीटा केसीन नावाचं प्रथिन असतं. जे वेगवेगळ्या स्वरूपात आढळतं. A1 दुधामध्ये A1 बीटा केसीन प्रथिन असतं आणि A2 दुधामध्ये A2 बीटा केसीन प्रथिन असतं. हा फरक गायीच्या जातीमुळे असतो. होल्स्टिन आणि जर्सी यासारख्या परदेशी जातीच्या गायी सामान्यतः A1 दूध देतात. गिर, साहिवाल आणि red सिंधी यासारख्या भारतीय देशी गायी बहुतेक वेळा A2 दूध देतात. A1 आणि A2 हे दूध खरंतर दिसायला same च असतं. पण याचा शरीरावर कोणता परिणाम होतो हे देखील महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे पचनातील फरक. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलंय की A2 दूध प्यायल्यानंतर काही लोकांना पोट फुगणं, gas किंवा जडपणा जाणवू शकतो.

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

अनेक लोक A2 दूध हलकं आणि अगदी सहज पचणारं आहे असं मानतात. याशिवाय A2 दूध थोडं अधिक मलईदार आणि घट्ट असल्याचं मानलं जातं. पण याच्या चवींमध्ये अजिबात फरक नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे A2 दूध हे सामान्य दुधापेक्षा महाग असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे A1 की A2. या दोन दुधांपैकी कोणतं दूध जास्त पौष्टिक आहे? पोषणाच्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या दुधात calcium, प्रथिन, vitamin B12 आणि potassium यासारखी आवश्यक पोषक तत्व असतात. पण एखाद्याला सामान्य दूध प्यायल्यानंतर पोटाचा त्रास जर होत असेल तर A2 दूध वापरून पाहू शकतात. पण याचा अर्थ A1 दूध हानिकारक आहे असं अजिबात नाही. आता A2 दुधाबाबत अनेक दावे करण्यात आलेत. पण याचा अर्थ असा नाही की A1 दूध हे खराब आहे. केवळ trend आहे म्हणून A2 दूध वापरायचंय असं अजिबातच नाहीये. दूध पिताना काय लक्षात ठेवायला हवं? तर जे दूध तुम्ही पीत आहे ते शुद्ध, ताजं आणि तुमच्या शरीराला व्यवस्थित पचन देणारं हवं. कारण आरोग्य हीच संपत्ती सर्वात महत्वाची.

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

Web Title: What is difference between a1 and a2 milk in marathi information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • health
  • lifestlye tips
  • raw milk

संबंधित बातम्या

अरेच्चा! पहिले दिला मुलाला जन्म, 5 दिवसांनी 3 नव्या बाळांना जन्म, Multiple Pregnancy म्हणजे काय? किती जोखमीचे
1

अरेच्चा! पहिले दिला मुलाला जन्म, 5 दिवसांनी 3 नव्या बाळांना जन्म, Multiple Pregnancy म्हणजे काय? किती जोखमीचे

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
2

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.