फोटो सौजन्य: Freepik
सध्या आपण डिजिटल युगात वावरत आहोत. आज बहुतेक गोष्टी या डिजिटल होत आहे. आधी एक काळ होता जेव्हा घरातील छोट्यातील छोटी गोष्ट करण्यासाठी आपल्याला बाहेर पडावे लागत आहे. परंतु आज डिजिटलायलेजशनमुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या वापराने घरबसल्या मिळत आहे. उदाहरणार्थ जेवण मागवायचे असेल तर झोमॅटो, स्वीगी, इत्यादी. पण आज यामुळे आपण मोबाईल आणि इत्यादी इलेकट्रोनिक उपकरणांचा वापर जास्त करत आहोत.
डिजिटलायलेजशनमुळे जीवन खूप सोपे झाले आहे यात काही शंका नाही. मात्र, याची किंमत आपण नकळतपणे मोजत आहोत. यामुळे अनेक समस्यांनी आपल्याला वेढलेले आहे, डिजिटल डिमेंशिया त्यापैकीच एक आहे.
डिजिटल डिमेंशिया ही मानसिक स्थितीसाठी वापरली जाणारी एक नवीन शब्द आहे ज्यामध्ये डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो. या स्थितीत, लोकांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. तसेच स्मरणशक्तीच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
हे देखील वाचा: भविष्यात होणारा डीमेंशिया वेळीच ओळखा; डोळ्यातील हे लक्षणे करतात सावधान
स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांचा सतत वापर केल्याने मेंदूच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. सोशल मीडिया, ईमेल आणि मेसेजिंग ॲप्सवरून सतत पुश नोटिफिकेशन्स येत असतात ज्यामुळे आपण सर्वेच विचलित होत असतो.
सतत मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर व्यस्त राहिल्याने स्मरणशक्ती कमजोर होते. संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक 3 तासांपेक्षा जास्त काळ डिजिटल उपकरणे वापरतात त्यांना बऱ्याच काळासाठी एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यास त्रास होतो.
डिजिटल डिमेंशियाच्या कारणांमध्ये जास्त स्क्रीन वेळ, सतत मल्टीटास्किंग आणि डिजिटल उपकरणांवर अवलंबून राहणे समाविष्ट आहे. विशेषतः, तरुण पिढी या समस्येचा सामना करत आहे, कारण हल्ली ते डिजिटल उपकरणांवर जास्त वेळ घालवताना दिसतात. परिणामी ते आपल्या माणसांमधील वैयक्तिक संवाद गमावत आहेत.