नात्यातील घोस्टिंग म्हणजे काय
आजकाल डेटिंग आणि नातेसंबंधांच्या जगात सामान्यपणे पाहिले जाणारे वर्तन म्हणजे ‘घोस्टिंग’. हा शब्द वाचून तुम्हाला थोडं घाबरल्यासारखं झालं असेल ना? घोस्टिंग म्हणजे एखाद्यावर काळी जादून करणे असं नाही तर याचा अर्थ कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय किंवा सांगितल्याशिवाय तुमच्या जोडीदाराशी अचानक संपर्क तोडणे किंवा त्यांना सर्वत्र ब्लॉक करणे.
यामध्ये ज्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे ती व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या कॉल्सला उत्तर देत नाही किंवा मेसेज करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद सांभाळत नाही. ही एक प्रकारची भावनात्मक अलिप्तता आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती अचानक दुसऱ्याकडे दुर्लक्ष करू लागते, जणू काही तो किंवा ती आयुष्यात कधीच अस्तित्वात नव्हती आणि ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला अधिक त्रास होतो. समुदेशक अजित भिडे यांनी ही संकल्पना स्पष्ट केली आहे आणि याचे काय परिणाम होतात तेदेखील सांगितले आहे (फोटो सौजन्य – iStock)
भावनिक असुरक्षितता
भावनिक असुरक्षिततेमुळे दुरावा निर्माण होणे
बऱ्याच वेळा लोकांना नातेसंबंधांमध्ये असुरक्षित वाटते आणि त्यांना असे वाटते की त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणतेही कारण न देता नात्यातून बाहेर पडणे. यामागचे कारण अनेकदा आत्मविश्वासाचा अभाव किंवा भविष्याबद्दल असुरक्षितता असू शकते. मात्र यामुळे समोरचा व्यक्ती अधिक त्रासला जातो आणि भावनिक अधिक खचला जातो याची काळजी घेतली जात नाही
कमिटमेंटची भीती
काही लोक वचनबद्धतेच्या विचाराने घाबरतात आणि जेव्हा नातेसंबंधात गांभीर्य येऊ लागते तेव्हा ते गांभीर्य अनेकजण हाताळू शकत नाहीत. त्या जबाबदारीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी असे लोक ‘घोस्टिंग’चा अवलंब करतात आणि या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे दोन्ही व्यक्तींसाठी योग्य नाही
हेदेखील वाचा – पुरूष नात्यात का देतात धोका? फक्त लैंगिक संबंधच नाही तर ही आहेत 5 धक्कादायक कारणं
भावना न मांडता येणं
भावना मांडत न आल्याने होणारा त्रास
काही लोकांना त्यांच्या भावना नीट मांडता येत नाहीत आणि नात्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याऐवजी ते शांतपणे निघून जाणेच बरे असे त्यांना वाटते. कठीण संवाद टाळण्याचा हा एक मार्ग आहे आणि यामुळे नातं एका वळणावर येऊन तुटण्याची शक्यता अधिक असते. कारण समोरची व्यक्ती एका मर्यादेपर्यंत हे वागणं सहन करू शकते
इंटरेस्ट संपणे
अनेक वेळा असं होतं की जोडीदाराला नात्यात रस नसतो, पण त्याला थेट सांगण्याची हिंमत नसते. अशा परिस्थितीत ‘घोस्टिंग’ हा एक सोपा पर्याय बनतो कारण तो कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भावनिक चर्चा टाळू शकतो. मात्र याचा परिणाम समोरच्या मनाच्या व्यक्तीवर काय होऊ शकतो याबाबत खोलवर विचार केला जात नाही. आपला इंटरेस्ट संपला म्हणजे सर्व काही संपले या स्वार्थी विचाराने हे पाऊल उचलले जाते.
हेदेखील वाचा – Chanakya Niti: नात्यात या 7 वेळी बसा गप्प, तरचं राहील टिकून
घोस्टिंगचा परिणाम
घोस्टिंगचा नात्यावर नक्की काय परिणाम होतो
‘घोस्टिंग’चा पीडितेवर खोल भावनिक प्रभाव पडतो. ज्या लोकांना याचा सामना करावा लागतो त्यांना अनेकदा नाकारल्यासारखे वाटते, त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो आणि ते नाते तुटण्याचे खरे कारण समजू शकत नाहीत. या अचानक झालेल्या बदलांमुळे मानसिक तणाव आणि नैराश्यही येऊ शकते आणि याचा परिणाम अनेकदा टोकाचे पाऊल उचलण्यामध्येही होऊ शकतो.
स्वतःला कसे सांभाळाल?
‘घोस्टिंग’चा सामना करणाऱ्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. हे समजून घेणे महत्वाचे आहे की दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनावर तुमचे नियंत्रण नाही. जर तुम्हाला ‘घोस्टिंग’चा अनुभव येत असेल, तर हे नाते तुमच्यासाठी योग्य नसल्याचे समजून घ्या. याशिवाय आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मित्र किंवा थेरपिस्टशी बोलणे देखील फायदेशीर ठरू शकते.