
गोवरचा वाढतोय कहर (फोटो सौजन्य - istock)
जगातील महासत्ता असलेल्या देशात गोवरने कहर माजवला आहे. अमेरिकेतील पश्चिम टेक्सासच्या ग्रामीण भागात गोवरच्या रुग्णांची संख्या १२४ वर पोहोचली आहे आणि १८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य आरोग्य विभागाने गेल्या मंगळवारी ही माहिती दिली. गोवर हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. त्याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका भागातील मेनोनाइट समुदायात दिसून येत आहे. हे नऊ काउंटींमध्ये पसरलेले आहे, ज्यात न्यू मेक्सिको, डॉसन, गॅसन, योआकम, एक्टर, लुबॉक, लिन, मार्टिन आणि डेलॅम्स काउंटी समाविष्ट आहेत.
लहान मुलांचा मोठा शत्रू
गोवर हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे जो विशेषतः लहान मुलांना प्रभावित करतो. हा आजार अत्यंत संसर्गजन्य आहे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. जर वेळेवर उपचार केले नाहीत तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. गोवर म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे. WHO ने गोवर म्हणजे नक्की काय आणि याबाबत संपूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहे आणि हे प्रत्येकालाच माहीत असायला हवे.
गोवर हा आजार नक्की काय आहे
गोवर हा मॉर्बिलीव्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. शरीरात प्रवेश केल्यानंतर तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ आणि श्वास घेण्यास त्रास निर्माण करते. सहसा याचा परिणाम लहान मुलांना होतो, परंतु जर लसीकरण नसेल तर प्रौढ देखील याला बळी पडू शकतात. गोवर सहसा १ ते १० वर्षांच्या मुलांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला योग्य वयात गोवरची लसही दिली जाते. मात्र सध्या याचा कहर टेक्सासमध्ये झाल्याचे दिसून येत आहे.
1 महिना खाल्लीच नाही साखर वा गोड? किती होईल वजन कमी; शरीरावर कसा होईल परिणाम
कसा पसरतो गोवर
गोवरची लक्षणे