मॅनोपोझमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात
प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे मॅनोपोझ. वयाच्या 45 ते 50 पासून मॅनोपोझचा काळ सुरु होते. या दिवसांमध्ये महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरात सातत्याने होणारे बदल, मासिक पाळीमधील अडचणी इत्यादी अनेक गोष्टींचा सामना महिलांना या दिवसांमध्ये करावा लागतो. मॅनोपोझ ही एक नैसर्गिक क्रिया असून प्रत्येक महिलेला या टप्प्यातून जावे लागते. त्यामुळे सर्वच महिलांचे सारखेच अनुभव असतील असे काही नाही.
प्रत्येक महिलेले तिच्या शरीरात जाणवणाऱ्या बदलांनुसार वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे मॅनोपोझचे दिवस महिलांसाठी कठीण ठरू शकतात. मॅनोपोझच्या दिवसांमध्ये महिलांमध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये मूड स्विंग्स, शरीरातील उष्णता वाढणे, वजन वाढणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मासिक पाली जाण्याआधी महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मासिक पाळी दरम्यान टॅम्पॉन्स किंवा पॅड यापैकी कोणता आहे सर्वोत्तम पर्याय ?
मासिक पाळीच्या चक्रामध्ये चूक झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. मेनोपॉझच्या दिवसांमध्ये अनियमित मासिक पाळी असते. दोन, तीन किंवा त्यापेक्षा ही जास्त महिना मासिक पाळी येत नाही. अशावेळी महिलांना अनेक समस्या जाणवतात. या काळात मासिक पाळी कधी येईल याची तारीख ठरलेली नसते. मेनोपॉझमध्ये महिलांची प्रजनन क्षमता संपून जाते आणि महिला बाळाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे याच प्रक्रियेला मेनोपॉझ असे म्हणतात.
वयाच्या चाळिशीनंतर महिलांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच अनेक मानसिक समस्या सुद्धा उद्भवतात. मेनोपॉझमध्ये एस्ट्रोजनचा थर कमी होऊन हाडांची घनता कमी होत जाते. यामुळे हाडे ठिसूळ व खिळखिळी होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच महिलांना मेनोपॉझच्या काळात हाडांचे आजार, ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.
मॅनोपोझचा काळ सुरु झाल्यानंतर महिलांमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. सतत चिडचिड करणे, कोणत्याही गोष्टीचा राग करणे, नैराश्याची भावना निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये मानसिक अस्थिरता निर्माण झाल्यानंतर महिलांचे मूड सतत बदलतात.
हे देखील वाचा: मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय
वजन वाढणे हे एक सामान्य लक्षण आहे. हार्मोनल बदलांमुळे मेटाबॉलिज्म कमी होण्यास सुरुवात होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी तशीच साठून राहते. शरीरात चरबीचे प्रमाण वाढल्यानंतर वजन वाढू लागते. वाढलेले वजन महिलांच्या आरोग्यसाठी त्रासदायक ठरू शकते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे शरीराची ऊर्जा कमी होण्यास सुरुवात होते.