रिडो कार्डियाक (फोटो सौजन्य - iStock)
जर एखाद्या रूग्णावर 10 वर्षांपूर्वी किंवा त्याहून अधिक काळापूर्वी पहिली शस्त्रक्रिया करण्यात असेल आणि यावेळी एनजाइना किंवा श्वासोच्छवासासारखी लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये पहिली ह्रदयाची शस्त्रक्रिया ही सीएबीजी(CABG) किंवा हार्ट व्हॉल्व्ह बदलण्याची शस्त्रक्रिया असते.
या यशस्वी प्रक्रियेमुळे आयुर्मान वाढल्याने आणि दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांमध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे हृदयरोगी यानंतर 15 ते 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरिता जगू शकतात. त्यानंतर मात्र रोग जसजसा वाढत जाईल तसतसे तुम्हाला दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते. 10 ते 15 वर्षांपूर्वी बदललण्यात आलेल्या हृदयाच्या झडपांचा हळूहळू ऱ्हास होऊ शकते आणि ते पुन्हा बदलण्याची आवश्यकता भासू शकते. डॉ. बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
संसर्ग होणे
संसर्ग कसा होतो
हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका तुलनेने कमी असतो. हृदयाच्या झडपाच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होणे ही एक गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती आहे. हा संसर्ग हृदयाच्या विविध भागांवर परिणाम करू शकतो किंवा पसरू शकतो जसे की हृदयाच्या झडपा, हृदयाजवळील भाग किंवा छाती. डॉक्टर अनेकदा विशिष्ट प्रतिजैविक किंवा औषधांची शिफारस करून संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करतात.
या प्रतिजैविकांनी बहुतेक हृदयाचे संक्रमण बरे होतात. अँटीबायोटिक्स घेतल्यानंतरही संसर्ग कायम राहतो तेव्हा पुन्हा हृदय शस्त्रक्रियेची गरज भासते. या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टराकडून संक्रमित ऊती काढून टाकल्या जातात आणि संसर्ग अधिक पसरू नये म्हणून संक्रमित क्षेत्र देखील स्वच्छ केले जाते. ही फॉलो-अप शस्त्रक्रिया अधिक क्लिष्ट आहे आणि भविष्यातील कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी अचूक उपचार योजना करणे आवश्यक आहे.
विविध प्रकारच्या संक्रमणांसाठी ह्रदयाच्या शस्त्रक्रियेची गरज भासू शकते जसे की एंडोकार्डिटिस (हृदयाच्या चेंबर्स आणि हृदयाच्या झडपांच्या अस्तरांना झालेला संसर्ग), प्रोस्थेटिक व्हॉल्व्ह एंडोकार्डिटिस (कृत्रिम हृदयाच्या झडपाचा संसर्ग), मेडियास्टिनाइटिस (मिडियास्टिनमचा फुफ्फुसाच्या संसर्गाचे क्षेत्र) आणि जखमेचा संसर्ग (स्टर्नम, स्तनाच्या हाडांमध्ये संसर्ग).
अवरोधित(blocked) रक्तवाहिन्या
कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) सारख्या परिस्थितीमुळे कार्डियाक शस्त्रक्रिया पुन्हा करण्याची गरज भासू शकते. कोरोनरी हृदयरोग हा हृदयविकाराचा एक प्रकार आहे जो कोलेस्ट्रॅाल आणि फॅटी पदार्थ जमा झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा अवरोधित करतो किंवा त्या प्रक्रियेत व्यत्यय आणतो.
यामुळे एनजाइना (छातीत दुखणे), अपचन, मळमळ, अनियमित हृदयाचे ठोके आणि दम लागणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. सीएडी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीय वाढवू शकते आणि आयुर्मान कमी करू शकते. रक्त प्रवाह पुनर्संचयित करण्यासाठी, हृदयाला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे रक्त मिळते याची खात्री करून आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका टाळण्यासाठी कार्डियाक शस्त्रक्रिया पुन्हा करणे आवश्यक असते.
हृदयाच्या झडपेसंबंधित समस्या
काय आहे रिडो कार्डियाक
हृदयाच्या झडपेसंबंधीत समस्या या विविध कारणांमुळे उद्भवू शकतात ज्यामुळे कार्डियाक शस्त्रक्रिया पुन्हा करण्याची गरज भासू शकते. हृदयाच्या झडपामध्ये महाधमनी, मिट्रल, पल्मोनरी आणि ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह हे चार व्हॅाल्व असतात जे रक्त प्रवाह नियंत्रित करतात. दोन हृदयाच्या झडपा, मिट्रल आणि ट्रायकस्पिड झडपा हृदयाच्या वरच्या भागातून (अट्रिया) हृदयाच्या खालच्या भागांमध्ये (किंवा वेंट्रिकल्स) रक्त प्रवाहास जबाबदार असतात.
काय होऊ शकते?
हृदयाच्या झडपांसंबंधी येऊ उद्भवू शकतात जेव्हा ते झीज झाल्यामुळे खराब होतात, हृदयाच्या व्हॉल्व्हमध्ये गळती होते किंवा ते अरुंद होतात ज्यामुळे स्टेनोसिस सारखी समस्या उद्भवते. स्थिती बिघडण्याआधी या समस्येचे त्वरीत निराकरण करणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास, हृदयाच्या झडपाच्या समस्येमुळे रक्ताच्या गुठळ्या, हार्ट फेल्युअर, अचानक हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात यांसारखे गंभीर जीवघेणे रोग होऊ शकतात.
हृदयासंबंधित समस्या आढळल्यास अनुभवी कार्डियाक सर्जनच्या सल्ल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करा. आधुनिक उपचार पद्धती, तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे दुसऱ्यांदा हृदय शस्त्रक्रियेचा धोका कमी आहे. कार्डियाक सर्जरी पुन्हा करण्याची गरज समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.