Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Silent Manipulation: गप्प राहून पार्टनर कंट्रोल करतोय नातं? कदाचित असू शकते सायलंट मॅनिप्युलेशन, म्हणजे नक्की काय

काही लोक नातेसंबंधांवर नियंत्रण ठेवू इच्छितात. ते त्यांच्या जोडीदाराला सायलंटली मॅनिप्युलेट करतात. ज्यामुळे नात्यात व्यक्ती त्यांच्या विचाराने चालते आणि आत्मविश्वास गमावते, म्हणजे नक्की काय?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 11, 2025 | 12:37 PM
सायलंट मॅनिप्युलेशन म्हणजे काय आणि नात्यावरील परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

सायलंट मॅनिप्युलेशन म्हणजे काय आणि नात्यावरील परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

नाते हे विश्वास, आदर, संवाद आणि समजुतीच्या पायावर दोन माणसांमध्ये दृढ होत असते. पण कधीकधी नात्यात अशा अनेक गोष्टी येऊ लागतात, ज्या हळूहळू तुमच्या नात्याला पोखरू लागतात. अशीच एक गोष्ट म्हणजे ‘सायलेंट मॅनिपुलेशन’.  तुमचा जोडीदार काहीही न बोलता, जबरदस्ती न करता तुम्हाला मानसिकरित्या अडकवतो आणि तुम्हाला त्याबाबत काहीच कळत नाही. 

तुम्हाला कळतही नाही आणि तुम्ही अशा नात्यात जाता जिथे तुम्हाला कोणताही विचार येत नसतो जोडीदार जे म्हणेल तेच तुम्हाला योग्य वाटते, आत्मविश्वास आणि आनंद असा या नात्यात उरत नाही. सायलेंट मॅनिपुलेशन म्हणजे काय आणि कसे होते हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. समुदेशक अजित भिडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

तुमचाच दोष असल्याचे जाणवून देणे

सतत तुम्ही दोषी आहात असा कांगावा करणे

जर तुमचा जोडीदार तुम्हाला वारंवार असे जाणवून देत असेल की तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही त्यांना दुखावले आहे किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही स्वतःलाच दोषी ठरवत असाल, तर समजून घ्या की तुमचा जोडीदार तुम्हाला सायलंट मॅनिप्युलेट करत आहे. तुमचे जोडीदार सर्वकाही अशा प्रकारे गोष्टी करू लागतात की तुम्हाला वाटू लागते की ती तुमची चूक आहे. यामुळे तुम्ही स्वतःलाच दोष देता आणि आत्मविश्वासही नाहीसा होतो 

Happy लव्ह लाईफ पाहिजे? हे घ्या सिक्रेट टिप्स, नात्यात राहील फक्त नि फक्त आनंद

सायलंट ट्रीटमेंट 

तुमच्या जोडीदाराला सायलंट ट्रीटमेंट देणे हादेखील सायलंट मॅनिप्युलेशनचा एक प्रकार आहे. जर तुमचा जोडीदार रागात काही बोलल्यानंतर किंवा चूक केल्यानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागला किंवा प्रतिक्रिया न देता पूर्णपणे गप्प बसला तर त्याला सायलंट मॅनिप्युलेशन म्हणतात. तुम्हाला मनातून चुकीचे वाटत राहते आणि तुम्ही काहीही बोलू शकत नाही आणि तुमची घुसमट होते 

तुमच्या भावना समजून न घेणे 

कधीही भावना समजून न घेणे

जर तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेऊ इच्छित नसेल आणि तुमच्या भावना इतक्या मोठ्या नाहीत असे तुम्हाला पटवून देत असेल, तर तो सायलंट मॅनिप्युलेशन करत आहे. म्हणजे नक्की काय तर, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या भावनांबद्दल सांगाल तेव्हा तो म्हणू लागेल, “एवढ्या छोट्या गोष्टीबद्दल इतका विचार का करायचा?” किंवा “हे असं काहीच नाही.” तेव्हा तुम्हालाही वाटू लागते की आपण एखाद्या गोष्टीचा खरंच बाऊ करत आहोत की काय? मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. गोष्ट लहान असो वा मोठी जोडीदाराने ऐकून घेणे आणि त्यावेळी तुम्हाला शांत करणे त्यावर बोलणे अपेक्षित आहे. 

तुम्हाला हे सर्व संकेत दिसत असतील तर तुम्ही वेळीच आपल्या जोडीदारापासून दूर होणे गरजेचे आहे. कारण या सगळ्यात तुम्ही स्वतःला गमावत आहात हे लक्षात घ्या आणि याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. 

Ghosting: नात्यात सुरू आहे ‘घोस्टिंग’, जोडीदार नक्की असे का वागतात, काय आहे अर्थ?

Web Title: What is silent manipulation in relationship know the signs if your partner behaves like this relationship tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • relationship advice
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
3

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.