लैंगिक आजार का बळावत आहेत (फोटो सौजन्य - iStock)
लैंगिक संक्रमित आजार (STDs) हे असे आजार आहेत जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने असुरक्षित संभोगाद्वारे पसरतात. हे रोग बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी किंवा बुरशीमुळे होऊ शकतात. काही लैंगिक संक्रमित आजार संक्रमित व्यक्तीशी कोणत्याही प्रकारच्या शारीरिक संपर्काद्वारे पसरू शकतात, जसे की गुप्तांग, तोंड किंवा गुद्द्वार यांच्याशी संपर्क.
पुरुष आणि महिलांमध्ये लैंगिक आजार वाढत आहेत याची अनेक कारणे आहेत. हे आजार लैंगिक संबंधांद्वारे पसरतात आणि काही घटक त्यांच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत ठरतात. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अंजली पाठक यांनी याबद्दल काही अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे, जी चुकूनही दुर्लक्षित करू नये. प्रत्येक महिलेला वा पुरुषांना याबाबत माहिती असायला हवी (फोटो सौजन्य – iStock)
असुरक्षित लैंगिक संबंध
असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे असुरक्षित शारीरिक संबंध. हे लैंगिक संक्रमित आजारांचे सर्वात महत्वाचे कारण आहे. जेव्हा पुरुष आणि महिला कंडोमसारखे संरक्षणात्मक उपाय वापरत नाहीत, तेव्हा त्यांना विविध आजारांची लागण होऊ शकते. असुरक्षित संभोगामुळे एचआयव्ही, गोनोरिया, सिफिलीस आणि इतर आजार पसरू शकतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, असुरक्षित संभोगानंतर पुरुष आणि महिलांना त्यांच्या गुप्तांगांवर जळजळ जाणवू शकते आणि पांढरा स्टार्च दिसू शकतो.
Pregnancy दरम्यान शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून योग्य माहिती
सिफलिस आजार
लैंगिक संक्रमित आजाराबाबत माहिती
सिफिलीस हा ट्रेपोनेमा पॅलिडम नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक गंभीर लैंगिक संक्रमित आजार आहे. हा आजार प्रामुख्याने असुरक्षित संभोगातून पसरतो. सिफिलीसच्या पहिल्या टप्प्यात तुमच्या गुप्तांगांवर, तोंडावर किंवा ओठांवर एक लहान, गुळगुळीत फोड येतो. ते पुरळासारखे दिसू शकते आणि इतके लहान आणि निरुपद्रवी असू शकते की तुम्हाला ते लक्षातही येणार नाही. ही जखम सुमारे सहा आठवड्यांत स्वतःहून बरी होते. सिफिलीसच्या दुसऱ्या टप्प्यात, खडबडीत, लाल किंवा तपकिरी पुरळ उठतात. असे दिसून येत असल्यास त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
क्लॅमिडिया
ज्या लोकांचे एकापेक्षा जास्त लैंगिक भागीदार असतात त्यांना क्लॅमिडीयाचा धोका वाढतो. हादेखील जीवाणूंमुळे होणारा लैंगिक संक्रमित आजार आहे. त्याची लक्षणे बहुतेकदा सौम्य असतात, परंतु जर त्यावर उपचार केले नाहीत तर ते प्रजनन प्रणालीला नुकसान पोहोचवू शकते, जसे की वंध्यत्व निर्माण करणे.
HIV ची लागण
असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे लैंगिक आजार बळावतो, एचआयव्हीची शक्यता
एचआयव्ही हा देखील लैंगिक संक्रमित आजार आहे, जो मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो. हा विषाणू व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अर्थात संरक्षण प्रणाली कमकुवत करतो, ज्यामुळे शरीर विविध संक्रमण आणि रोगांना बळी पडते. जर एचआयव्हीवर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते एड्समध्ये विकसित होऊ शकते जी जीवघेणी स्थिती असू शकते.
पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवल्यावर होतात शरीरात 8 बदल, लग्नापूर्वी हे माहीत असायलाच हवे
हर्पिस व्हायरस
हर्पिस विषाणू (HSV) मुळे होणाऱ्या या आजारामुळे त्वचेवर फोड आणि व्रण येतात. हे सहसा गुप्तांगांवर किंवा तोंडाभोवती होते. हा संसर्ग आयुष्यभर टिकणारा आहे आणि संसर्ग बरा झाल्यानंतर तो पुन्हा सक्रिय होऊ शकतो. लैंगिक संक्रमित आजारांची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा सौम्य असतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, जे करणे योग्य नाही
हे आजार पुरुष वा महिला असे लिंग न पाहता कोणालाही होऊ शकतात. त्यामुळे पुरूष आणि महिलांनी लैंगिक संबंध ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे असेही तज्ज्ञांनी यावेळी स्पष्ट केले